Creta Facelift SUV : ह्युंदाई मोटर्सकडून त्यांची क्रेटा फेसलिफ्ट एसयूव्ही कार लवकरच भारतात लॉन्च केली जाणार आहे. कंपनीने अनेकदा क्रेटा फेसलिफ्ट एसयूव्ही कारची अनेकदा भारतात चाचणी देखील घेतली आहे.
चाचणी दरम्यान अनेकदा क्रेटा फेसलिफ्ट एसयूव्ही कार दिसून आली आहे. त्यामुळे कारचे फीचर्स आणि डिझाईन लीक झाले आहे. कारच्या डिझाईनमध्ये देखील बदल करण्यात आले आहेत. ह्युंदाई मोटर्सकडून रिलीज करण्यात आलेल्या क्रेटा फेसलिफ्टच्या टिझरमध्ये देखील कारचे डिझाईन दिसत आहे.
क्रेटा फेसलिफ्ट एसयूव्ही कारमध्ये अनेक मोठे बदल केले जाणार आहेत. आता ह्युंदाई मोटर्सने क्रेटा फेसलिफ्ट एसयूव्ही कारची बुकिंग देखील सुरु केले आहे. लवकरच ही कार भारतात लॉन्च केली जाईल.
Hyundai Creta Facelift साठी बुकिंग सुरु आहे
तुम्हालाही ह्युंदाई मोटर्सची नवीन क्रेटा फेसलिफ्ट एसयूव्ही कार खरेदी करायची असेल तर तुम्ही अवघ्या 25,000 रुपये टोकन रक्कम भरून क्रेटा फेसलिफ्ट एसयूव्ही कार बुक करू शकता. जवळच्या ह्युंदाई डिलरशिप किंवा कंपनीच्या अधिकृत ऑनलाईन वेबसाइट वर जाऊन तुम्ही नवीन क्रेटा बुक करू शकता.
ह्युंदाई मोटर्स क्रेटा फेसलिफ्टच्या 7 प्रकारांसाठी बुकिंग घेत आहे. 16 जानेवारीला क्रेटा फेसलिफ्ट एसयूव्ही कार भारतात लॉन्च केली जाणार आहे. ह्युंदाई मोटर्स नवीन क्रेटा एसयूव्ही कारचे E, EX, S, S(O), SX, SX(Tech), SX(O) व्हेरियंट बाजारात आणणार आहे. क्रेटा फेसलिफ्ट एसयूव्ही कारमध्ये 6 मोनो टोन आणि एक ड्युअल टोन बाह्य रंग पर्याय दिले जातील.
ह्युंदाई क्रेटा फेसलिफ्ट
क्रेटा फेसलिफ्ट एसयूव्ही कारच्या बाह्य डिझाईनसह इंटिरियर डिझाईन देखील बदलण्यात आले आहे. कारचे इंटिरियर प्रीमियम बनवण्यात आले आहे. कारमध्ये पूर्वीपेक्षा मोठी आणि आकर्षक फ्रंट ग्रिल देण्यात येईल. LED हेडलॅम्पचा लूक खूपच शार्प करण्यात आला आहे.
कार इंजिन
ह्युंदाई मोटर्स सध्या क्रेटा एसयूव्ही कारमध्ये देण्यात येत असलेले पेट्रोल आणि डिझेल इंजिन पर्याय देण्यात येणार आहे. तसेच कारमध्ये नवीन 1.5 लीटर कप्पा टर्बोचार्ज्ड GDI पेट्रोल इंजिन पर्याय देखील दिले जाणार आहे. कारमध्ये तीन इंजिन पर्याय दिले जाणार आहेत.