Ahmednagar News : अॅड. ढाकणेंनी मुख्याधिकाऱ्यांची खुर्ची फेकून दिली, सात वेळा फोन करूनही फोन न घेतल्याने आंदोलनकर्त्यांकडून पालिकेत तोडफोड

Ahmednagarlive24 office
Published:
Ahmednagar News

Ahmednagar News : अहमदनगर मधील पाथर्डी मध्ये राष्ट्रवादीच्या कार्यर्त्यांनी मुख्याधिकाऱ्यांची खुर्ची पहिल्या मजल्यावरून थेट खाली फेकून दिली, तसेच कार्यकर्त्यांनी तेथील खुर्च्यांची मोडतोड केल्याची घटना घडली आहे.

आंदोलनसमयी अॅड. प्रताप ढाकणे यांनी मुख्याधिकारी संतोष लांडगे यांना सात वेळा फोन करूनही त्यांनी फोन न उचलल्याने संतप्त होऊन आंदोलनकर्त्यांनी हा प्रकार केल्याचे समजते.

अधिक माहिती अशी : नगरपालिका हद्दीतील विविध प्रलंबित प्रश्नांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) व आपच्या कार्यकत्यांनी मंगळवारी मुख्याधिकाऱ्यांच्या दालनात आंदोलन केले. नवी पेठेतील काम बंद पडलेल्या रस्त्याची पाहणी करत ढाकणे,

कार्यकर्ते व पदाधिकारी पालिका कार्यालयात गेले. तेथे कायर्यालय अधीक्षक, पालिका अभियंता व अन्य कर्मचाऱ्यांबरोबर चर्चा केली परंतु एकही कर्मचारी जबाबदारीने उत्तर न देता वेळ मारून नेत असल्याचे लक्षात येताच ते आक्रमक झाले.

त्याआधी ढाकणे यांनी मुख्याधिकाऱ्यांना सातवेळा फोन केला असल्याचे सांगितले जाते. परंतु त्यांचा फोन एंगेज येत होता. फोन घेण्याचे टाळत असल्याचे पाहून ढाकणे व समर्थक यांनी संतप्त होत घोषणाबाजी करत मुख्याधिकाऱ्यांची खुर्ची खाली फेकून दिली व तेथील काही खुर्च्यांची तोडफोड केली.

 ‘राडा’ झाल्याचे समजताच मुख्याधिकाऱ्यांचा तातडीने फोन

पालिका कार्यालयात आंदोनकर्ते संतप्त झाले आहेत. या आंदोलनकर्त्यांनी राडा केल्याचे समजताच मुख्याधिकारी संतोष लांडगे यांनी स्वत:हून अॅड. प्रताप ढाकणे यांना फोन लावला. बुधवारी सकाळी दहा वाजेपर्यंत कोणत्याही परिस्थितीत रस्त्याचे काम करण्याचे आश्वासन त्यांची यावेळी दिले असल्याचे समजते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe