Pm Vishwakarma Yojana : या चालू वर्षात लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका राहणार आहेत आणि लोकसभेच्या निवडणुका झाल्यात की लगेचच महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका होणार आहेत. यामुळे आतापासूनच सर्वत्र निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत.
सगळीकडेच सर्वसामान्यांना खुश करण्यासाठी वेगवेगळ्या घोषणा होत आहेत. एप्रिल-मे 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नुकत्यात दोन महिन्यांपूर्वी केंद्रातील मोदी सरकारने पारंपारिक कारागिरांसाठी एक अतिशय महत्त्वाची योजना सुरू केली आहे.

पीएम विश्वकर्मा योजना नावाची नवीन स्कीम केंद्रातील मोदी सरकारने जाहीर केली आहे. या अंतर्गत पारंपारिक कारागिरांना प्रशिक्षण दिले जाणार आहे सोबतच व्यवसायासाठी त्यांना कर्ज देखील उपलब्ध होणार आहे. पीएम विश्वकर्मा योजनेअंतर्गत देशातील बारा बलुतेदार, 18 पगड समाजातील पारंपरिक कारागिरांना तीन लाख रुपयांपर्यंतचे कर्ज उपलब्ध करून देण्याचा मानस आहे.
दरम्यान या योजनेसंदर्भात अहमदनगर जिल्ह्यातून एक अतिशय महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार जिल्ह्यातील 3489 कारागिरांनी या योजनेसाठी नोंदणी केली आहे. त्यामध्ये सरपंचाची ही नोंदणी करणे आवश्यक आहे.
या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील 1320 सरपंचांनी नोंदणी पूर्ण केली असल्याची माहिती समोर आली आहे. अगदी खेड्यापाड्यात राहणाऱ्या पारंपारिक कारागिरांच्या उत्थानासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे. याअंतर्गत कारागिरांना मिळणारे तीन लाखांपर्यंतचे कर्ज हे पाच टक्के व्याजदरात उपलब्ध होणार आहे.
खरे तर हे कर्ज 11% व्याजभरात उपलब्ध होणार आहे मात्र उर्वरित आठ टक्के व्याजदर हे शासनाच्या माध्यमातून वहन केले जाणार आहे. उर्वरित आठ टक्के व्याजाचा भार सूक्ष्म, लघु व मध्यम व्यवसाय मंत्रालयाच्या माध्यमातून उचलला जाणार आहे.
यामुळे कारागिरांना व्यवसाय करताना मोठे आर्थिक सहाय्य उपलब्ध होणार असून त्यांचा व्यवसाय यामुळे वाढेल असा आशावाद व्यक्त होत आहे. दरम्यान आता आपण या योजनेचे स्वरूप नेमके कसे आहे याविषयी थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत.
कस आहे योजनेचे स्वरूप :- ही योजना दोन महिन्यांपूर्वी केंद्रातील मोदी सरकारने सुरू केलेली एक महत्त्वाकांक्षी योजना आहे. या योजनेच्या स्वरूपाबाबत बोलायचं झालं तर या अंतर्गत 18 पारंपारिक व्यवसायांना अर्थसहाय्य उपलब्ध करून दिले जाणार आहे.
या पारंपारिक व्यवसायाच्या वाढीसाठी या योजनेअंतर्गत पुढाकार घेतला जाणार आहे. या अंतर्गत पारंपारिक कारागिरांना कोणत्याही हमी विना तसेच कोणतेही तारण न ठेवता एकूण दोन हप्त्यात तीन लाख रुपयांपर्यंतचे कर्ज मिळणार आहे.
यात पहिल्या टप्प्यात एक लाख रुपयांचे कर्ज मिळणार आहे. याची परतफेड संबंधित कारागिराला एकूण 18 हप्त्यात करावी लागणार आहे. तसेच दुसऱ्या टप्प्यात दोन लाख रुपयांचे कर्ज मिळेल आणि याची परतफेड संबंधित कारागिराला 30 हफ्त्यात करावी लागणार आहे.