अहमदनगर : फक्त महिलांसाठीच या कर्जत जामखेडमध्ये असा प्रोजेक्ट आणेन की, संपूर्ण कर्जत-जामखेडमधील महिलांना मानाचं स्थान त्याच्यामधून मिळाल्याशिवाय राहणार नाही. असे सांगत आमदार राम शिंदे यांनी महिलांसाठी मतदारसंघात मोठा प्रोजेक्ट आणणार असल्याचा संकल्प नववर्षाच्या प्रारंभी केला.
आमदार राम शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त जामखेड तालुक्यातील नान्नजमध्ये आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात ते बोलत होते.

पुढे ते म्हणाले की, मी जलसंधारण मंत्री होतो तेव्हा मतदारसंघात जलयुक्त शिवार योजना राबवली. त्यामुळे मतदारसंघात कुठेही गेल्या पाच वर्षांत टँकर लागला नाही. महिलांच्या डोक्यावरचा हंडा उतरला. आता गावोगावी जलजीवन योजनेचे काम सुरू आहे.
लवकरच या योजनेतून घरोघरी शुध्द पाण्याचा पुरवठा होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या धोरणामुळे महिला बचत गटांच्या आर्थिक सक्षमीकरणात झपाट्याने वाढ होत आहे. मी १५ वर्षांपासून आमदार आहे. मंत्री झालो.
माझ्या अनेकदा सभा झाल्या पण कधीच आजच्या एवढ्या महिला माझ्या सभेला जमल्या नाहीत. पण गेल्या वर्षी व यावर्षी नान्नजमध्ये प्रचंड संख्येने महिला जमल्या आहेत. त्यामुळे या महिलांसाठी मोठा प्रोजेक्ट आणणार असल्याचा संकल्प नववर्षाच्या प्रारंभी केला.