Ahmednagar Breaking : ठरलं ! लोकसभेला विखेंविरोधात लंकेचं उभे राहणार, आ. लंके यांनी मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी सुरु केली शिवस्वराज्य यात्रा

Published on -

Ahmednagar Breaking : आगामी लोकसभा निवडणूक चांगल्याच रंगणार असल्याच सध्यातरी दिसत आहे. आता या निवडणुकांमध्ये प्रत्येक पक्षाची प्रतिष्ठा पणाला लागेल यात शंका नाही. त्यात लोकसभेची ‘अहमदनगर’ च्या लोकसभेची चर्चा जवळपास वर्षभरापासून सुरु आहे.

भाजपकडून येथे खा. सुजय विखे हे उमेदवार निश्चित मानण्यात येत आहेत. पण त्यांना विरोधक म्हणून आ. निलेश लंकेच उभे राहतील अशी देखील चर्चा आहे. परंतु ते उभे राहतील कि नाही याबाबत मात्र शंका होती.

परंतु आता स्वतः निलेश लंके यांच्या पत्नी राणीताई लंके यांनी लोकसभा लढवण्याचा निर्धार बोलून दाखवला आहे.

शिवस्वराज्य यात्रा

शिवराज्याभिषेक सोहळ्यास ३५० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल आमदार नीलेश लंके यांच्या पुढाकाराने शिवस्वराज्य यात्रा बुधवारी सुरू करण्यात आली आहे. श्रीक्षेत्र मोहटा देवी येथे महापूजा करून शिवस्वराज्य यात्रेस सुरवात झाली.

आता या यात्रेद्वारे नगर लोकसभा मतदारसंघातील प्रत्येक गावात जाऊन शिवप्रेमींशी संवाद साधला जाणार आहे. राणीताई लंके व आमदार लंके यांचे पोस्टर असलेल्या जीपवर लाऊड स्पीकर लावले असून तेथेच सभेसाठी व्यासपीठ तयार केले आहे.

विविध गाड्यांचा ताफा व प्रतिष्ठानचे पदाधिकारी एकाच वेळी या रथातून गावोगावी जाऊन शिवराज्याभिषेकावर व्याख्यान दिले जाईल.

 प्रतिस्पर्धी उमेदवार कोण याचा विचार न करता लोकसभा लढवणार

या यात्रेच्या पार्श्वभूमीवर शासकीय विश्रामगृहावर आयोजित पत्रकार परिषदेत राणीताई लंके यांनी पत्रकारांशी संवाद साधला. प्रतिस्पर्धी उमेदवार कोण आहे, याचा विचार न करता लोकसभा लढवणार असल्याचा निर्धार त्यांनी यावेळी व्यक्त केला.

सध्यातरी भाजपच्या वतीने खासदार डॉ. सुजय विखे यांची उमेदवारी गृहीत धरली जात असून दुसरीकडे लंके प्रतिष्ठानच्या कार्यकत्यांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. राणीताई म्हणाल्या की, लोकसभा निवडणूक डोळ्यापुढे ठेवून शिवस्वराज्य यात्रेचे आयोजन केले गेले असून

आमच्या दोघांपैकी कोणीही एक जण निवडणूक निश्चित लढवणार आहे. त्यामुळे आता अहमदनगरची फाईट विखे विरुद्ध लंके अशीच होईल असे सध्यातरी दिसते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe