Ahmednagar Breaking : अहमदनगर जिल्ह्यातील ह्या ठिकाणी मृतदेह आढळला

Published on -

Ahmednagar Breaking : निपाणी जळगाव हद्दीत मंगळवारी सापडेलल्या हाताच्या पंज्याचा अखेर तपास लागला आहे. जवळच कोरडगाव शिवारात कपाशीच्या शेतामध्ये विकी दुसिंग भोसले, रा. निपाणी जळगाव (वय २५),

यांचा मृतदेह पोलिसांना बुधवारी सापडला आहे. मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असल्याने जागेवरच शवविच्छेदन करण्यात आले.

ग्रामिणचे पोलिस उपाधिक्षक सुनिल पाटील, पोलिस निरीक्षक संतोष मुटकुळे, सहाय्यक पोलिस निरीक्षक रामेश्वर कायंदे, राजगुरु, उपनिरीक्षक सचिन लिमकर, भाऊसाहेब खेडकर, किरण बडे यांनी घटनास्थळाला भेट दिली.

दि. २३ डिसेंबर २०२३ रोजी विकी भोसले हरवल्याची तक्रार त्याच्या नातेवाईकांनी पाथर्डी पोलिसांत दिली होती. मंगळवारी निपाणी जळगाव शिवारात हाताचा पंजा सापडला होता.

बुधवारी पोलिसांनी शोध घेतला असता, कोरडगाव शिवारात विकी दुसिंग भोसले यांचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत कपाशीच्या शेतामध्ये आढळून आला. जाग्यावरच शवविच्छेदन करण्यात आले. विकी भोसले याचा मृत्यू नेमका कशाने झाला,

याचा तपास पोलिस घेत आहेत. नातेवाईकांच्या चौकशीनंतर याबाबत काय ते सत्य बाहेर येईल.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe