MP Sujay Vikhe : २२ जानेवारीला प्रत्येकाने आपल्याला मिळालेल्या साखर आणि हरभरा दाळीचे लाडू करून गावातील मंदिरात नैवेद्य ठेऊन, दिवाळीप्रमाणे सर्वांनी उत्सव साजरा करावा. त्यासाठी साखर, डाळ वाटपाचा हा उपक्रम हाती घेतला आहे.
यात कुठलेही राजकारण नाही. व विरोधकांनीही ते करू नये. राजकारणासाठी पुष्कळ वेळ व ठिकाण बाकी आहे. हा आपल्या श्रद्धेचा व भावनेचा, अभिमानाचा विषय असून हा कुठलाही राजकीय किंवा जातीचा, पक्षाचा कार्यक्रम नाही, असे प्रतिपादन खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांनी केले.
राहुरी तालुक्याच्या पूर्व भागातील आरडगाव, मानोरी, वळण, आदी गावात नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली, खासदार डॉ. सुजय विखे पाटील व जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डिले यांच्या हस्ते ग्रामस्थांना साखर, डाळ वाटपाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला.
यावेळी खासदार डॉ. विखे पाटील म्हणाले की, राजकारण करण्यासाठी संपूर्ण आयुष्य पडले आहे. परंतु आम्ही राम मंदिराचा उत्सव व्हावा, म्हणून प्रत्येक गावात साखर आणि डाळ वाटतो आहे. पण विरोधांना हे देखवत नाही ते याच्यावरही टीका करत आहे. खरतर हा उत्सव म्हणून साजरा करावा म्हणून हा उपक्रम आम्ही हाती घेतला आहे.
यावेळी जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजीराव कर्डिले म्हणाले की, विरोधक हे कुणाला कपभर चहा पाजत नाहीत. अन् आम्हाला हत्तीवरून साखर वाटा, असे सांगून आमच्यावर टिका करत आहेत.
अहमदनगर जिल्ह्यात मोठ-मोठे साखर कारखादार आहेत. मात्र प्रवरा सहकारी साखर कारखान्याने ३ हजार रूपये दर देऊन सर्व ऊस घेऊन जाणार आहेत. तसेच वळण बँकेसाठी लवकरच लॉकर सुविधा उपलब्ध करून देऊ, असे आश्वासन त्यांनी दिले.
याप्रसंगी भाजपाचे राहुरी तालुकाध्यक्ष सुरेशराव बानकर, सूर्यभान भोंगळ, भाजप युवाचे अध्यक्ष रवींद्र म्हसे, आरडगावच्या सरपंच सुरेखा म्हसे, उपसरपंच उत्तम वने, माजी उपसभापती दत्तात्रय खुळे, संचालक अनिल आढाव, आर. आर. तनपुरे, वळणचे सरपंच सुरेश मकासरे, लिलाबाई गोसावी, आशाबाई खुळे,
शोभा आढाव, मानोरीच्या सरपंच ताराबाई भिमराज वाघ, उपसरपंच बाळासाहेब आढाव, संचालक उत्तमराव आढाव, शिक्षक बँकेचे संचालक उत्तमराव खुळे, युवा नेते बापुसाहेब वाघ, पोपट पोटे, चेअरमन शरद पोटे, शिक्षक आघाडीचे अध्यक्ष साहेबराव तोडमल, शिवाजी थोरात, अण्णासाहेब तोडमल आदी उपस्थित होते.