Maharashtra News : टेम्पो पलटी होऊन झालेल्या अपघातात चालकाचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी (दि.३) पहाटे तालुक्यातील चंदनापूरी घाटात घडली.
याबाबत समजलेली माहिती अशी की, पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरून आयशर टेम्पो भरधाव वेगाने जात होता.
हा टेम्पो तालुक्यातील चंदनापूरी घाटात आला असता, टेम्पो चालकाचा आपल्या वाहनावरील ताबा सुटला. त्यामुळे हा टेम्पो महामार्गावर पलटी झाला.
या अपघातामध्ये राजू हिंम्मतराव घोरपडे (वय ३३, रा. जालना) हा टेम्पो चालक टेम्पोखाली दबल्याने त्याचा मृत्यू झाला.
अपघाताची माहिती समजतात महामार्ग पोलीस घटनास्थळी पोहचले. महामार्ग पोलिसांनी क्रेनच्या सहाय्याने अपघातग्रस्त टेम्पो रस्त्याच्या बाजूला घेतला.