Personal Loan: किती पगार असल्यावर मिळते पर्सनल लोन? पर्सनल लोन घेण्यापूर्वी ‘या’ गोष्टी नक्की पहा

Ajay Patil
Published:
personal loan tips

Personal Loan:- जीवनामध्ये आपल्याला केव्हा कोणत्या प्रकारची आर्थिक गरज उद्भवेल याची कुठलेही प्रकारची शाश्वती नसते. अगदी सगळे व्यवस्थित सुरू असताना अचानक घरामध्ये कुणाला तरी काही आजाराचा प्रादुर्भाव होतो व आपत्कालीन परिस्थितीमध्ये वैद्यकीय खर्च उद्भवतो.

तसेच घरामध्ये काही लग्न समारंभा सारखे खर्चिक कार्यक्रम आयोजित केले जातात. या व अशा इतर अनेक प्रकारच्या गरजांकरिता आपल्याला वेळेवर अचानकपणे मोठ्या प्रमाणावर पैशांची आवश्यकता भासते. अशावेळी आपल्याकडे हवा तेवढा पैसा बँक खात्यात असतोच असे नाही.

त्यामुळे आपल्याला बँक किंवा इतर वित्तीय संस्थांच्या माध्यमातून कर्जाच्या माध्यमातून पैसा उभारावा लागतो. याकरिता बरेच जण पर्सनल लोनचा आधार घेतात. असे हल्लीच्या कालावधीमध्ये कर्ज मिळण्याची प्रक्रिया सोपी व सुटसुटीत झाल्यामुळे अगदी कमीत कमी कागदपत्र देऊन तुम्ही पर्सनल लोन घेऊ शकतात.

परंतु अशा पद्धतीने लोन देताना बँकांच्या काही अटी व शर्ती असतात व त्या तुम्हाला पूर्ण करणे देखील गरजेचे असते. त्या तुम्ही पूर्ण करत असाल तर तुम्हाला ताबडतोब पर्सनल लोन दिले जाते व या पैशांच्या माध्यमातून तुम्ही तुमची आर्थिक गरज भागवू शकतात.

परंतु आपण अशा पद्धतीने कर्ज घेताना काही गोष्टींची काळजी घेणे देखील तितकेच गरजेचे असते. अनुषंगाने या लेखात आपण पर्सनल लोन घेताना कुठल्या गोष्टींची काळजी घ्यावी याची माहिती घेणार आहोत.

  पर्सनल लोन किती पगार असल्यावर मिळते?

पर्सनल लोन हे असुरक्षित प्रकारातील कर्ज असल्यामुळे कर्जाकरिता तुम्हाला कुठल्याही प्रकारची मालमत्ता गहाण किंवा तारण म्हणून बँकेला देण्याची गरज नसते. नोकरदार व्यक्तींना पर्सनल लोन ताबडतोब दिले जाते. परंतु संबंधित व्यक्तीकडे कर्जासाठी निश्चित आर्थिक उत्पन्नाचा स्त्रोत असणे खूप गरजेचे असते.

नोकरदार व्यक्तींच्या बाबतीत पाहिले तर कमीत कमी 30 हजार रुपयांच्या पगारावरच तुम्हाला पर्सनल लोन मिळू शकते. निवृत्त झालेली व्यक्ती असेल तर अशा व्यक्तींना पर्सनल लोन मिळणे अशक्य असते किंवा बँक यासंबंधी विचार करूनच निर्णय घेते.

 पर्सनल लोन घेताना या गोष्टी पहा

1- सर्वप्रथम यामध्ये तुम्हाला कर्ज का हवे आहे? हा प्रश्न स्वतःला विचारणे महत्त्वाचे आहे. कारण तुम्ही जे कर्ज घेत आहात यामध्ये तुमची आर्थिक गरज भागेल का या प्रश्नाचे उत्तर तुम्ही स्वतःला विचारणे गरजेचे आहे.

2- जर आपण पर्सनल लोनचा अर्थ पाहिला तर लोन एग्रीमेंट करणे आणि गरजेपेक्षा जास्त कर्ज न घेणे असा होतो. कर्ज घेण्या अगोदर तुम्हाला नेमकं किती कर्ज हवं आहे हे लक्षात घेऊनच तुम्ही त्या संबंधी निर्णय घ्यावा.

3- तसेच पर्सनल लोन घेण्यापूर्वी कर्ज किती कालावधी करिता घेतलं आहे हे तुम्ही लक्षात घ्यावे. साधारणपणे पर्सनल लोनचा परतफेडीचा कालावधी 12 ते 60 महिने इतका असतो. तुम्हाला जर कर्जाचा हप्ता कमी ठेवायचा असेल तर तुम्ही जास्त कालावधी करिता कर्जाची निवड करावी.

4- सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे बँकेत किंवा इतर वित्तीय संस्थेत पर्सनल लोन करिता अर्ज करण्या अगोदर तुम्ही स्वतःचा सिबिल स्कोर चेक करून घेणे गरजेचे आहे. तुमचा सिबिल साडेसातशे किंवा त्यापेक्षा जास्त असेल तरच तुम्हाला पर्सनल लोन मिळणे शक्य होते.

5- तसेच पर्सनल लोन घेण्याअगोदर त्यासाठी लागणारे कागदपत्रांची माहिती तुम्ही करून घ्यावी व त्या पद्धतीने कागदपत्रे स्वतःकडे जमा करून घ्यावेत. त्यामध्ये तुम्हाला आधार कार्ड तसेच पासपोर्ट, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, मतदान कार्ड तसेच आयडी प्रूफ सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे आयटीआर रिटर्न डिक्लेरेशन इत्यादी कागदपत्रे लागतात.

 त्यामुळे पर्सनल लोन घेण्याअगोदर या व इतर काही महत्त्वाची माहिती तुम्ही अगोदर जमा करून अर्ज करावा.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe