अधुनिक क्रिकेटमध्ये तंत्रशुध्द खेळ आणि जबरदस्त फिटनेस आवश्यक असतो. भारतच कर्णधार विराट कोहली यांच्यामध्ये या गुणांचा संगम दिसतो.
त्यामुळे विराट वनडे ,कसोटी, ट्वेन्टी ट्वेन्टी हा तीनही प्रकारच्या क्रिकेट मध्ये सर्वश्रेष्ठ फलंदाज आहे असे मत ऑस्ट्रेलिया संघाचे माजी कर्णधार इयान चॅपेल यांनी व्यक्त केले आहे.
याआधी इंग्लडचा माजी क्रिकेटपटू केविन पिटरसन याने ऑस्ट्रेलियाचा फलंदाज स्टिव्ह स्मिथ हा कोहलीच्या आसपास देखील नसल्याचे सांगीतले होते.
अंतराराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कोहलीच्या नावावर 70 शतक आहेत, त्यासोबत त्याने 20 हजापपेक्षा जास्त धावा त्याने केल्या आहेत. त्यासोबतच क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात धावांची सरासरी ही 50 पेक्षा जास्त आहे.
कोहली हा सर्वश्रेष्ठ का आहे? या प्रश्नाचे उत्तर देताना चॅपल यांनी सांगीतले की, ‘मला विराट फलंदाजीची पध्दत आवडते, त्यासोबतच कोहलीमध्ये मला एक परिपूर्ण फलंदाज दिसतो.
कसोटी सामन्यात संयम राखून जमिनीलगतच्या फटक्यांनी धावा करणारा कोहली टी20 तसेच एकदिवसीय सामन्यांतही तो जास्त फटकेबाजीचा विचार नकरता संयमाने खेळतो.
त्याला फारसे षटकार लगावण्याची कधीही गरज भासत नाही. त्यासोबतच विराटचा फिटनेस हा कमीलीचा आहे त्यामुळेच आधुनिक काळात कोहलीच सर्वोत्तम फलंदाज आहे,’’ असेही चॅपेल यांनी यावेळी स्पष्ट केले.