Rajbhang Rajyog 2024 : ज्योतिष शास्त्रात नऊ ग्रहांना विशेष महत्व आहे. नऊ ग्रहांमध्ये मंगळ, राहू आणि न्याय देवता शनि हे इतर ग्रहांच्या तुलनेत खूप महत्त्वाचे मानले जातात. जेव्हा-जेव्हा हे ग्रह आपली राशी बदलतात तेव्हा-तेव्हा विशेष योग, राजयोग तयार होतात, ज्याचा 12 राशींवर शुभ आणि अशुभ प्रभाव असा पडतो. दरम्यान, मकर संक्रांतीच्या आधी, मंगळ, शनि आणि राहू पासून राजभंग राजयोग तयार होत आहे, जो 3 राशींसाठी खूप भाग्यवान सिद्ध होणार आहे.
ज्योतिष शास्त्रानुसार सध्या मंगळ धनु राशीत आहे आणि मिथुन राशीत सातव्या भावात स्थित आहे, अशा स्थितीत शनि आणि राहू या दोघांची दृष्टी राशी मंगळावर पडत आहे, त्यामुळे राजभंग राजयोग तयार होत आहे. जो 5 फेब्रुवारीपर्यंत चालेल. या काळात काही राशींना खूप लाभ मिळणार आहेत, कोणत्या आहेत त्या राशी चला पाहूया…
सिंह
राजभंग राजयोग सिंह राशीच्या लोकांसाठी उत्तम ठरेल. या काळात प्रदीर्घ प्रलंबित कामांना गती मिळेल. तसेच तुमच्या कुटुंबासोबत तुम्ही चांगला वेळ घालवाल, तुम्ही कोणतीही नवीन योजना करत असाल तर त्यात तुम्हाला यश मिळेल. नशीब तुमच्या बाजूने असेल. व्यवसायासाठी वेळ चांगला राहील. नोकरी आणि करिअरमध्ये आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. तुम्हाला तुमच्या मुलांकडून काही चांगली बातमी मिळू शकते. शैक्षणिक क्षेत्रात यश मिळेल. भाऊ-बहिणीकडून पूर्ण सहकार्य मिळेल.
कर्क
या काळात कर्क राशीच्या लोकांना विशेष लाभ मिळतील. तसेच नशीब पूर्णपणे तुमच्या बाजूने असेल. दीर्घकाळ प्रलंबित व रखडलेली कामे पूर्ण होतील. परदेशात जाण्याची संधी मिळू शकते. तरुणांना काही चांगली बातमी मिळू शकते. अविवाहित लोकांसाठी काळ चांगला जाणार आहे, लग्नाचे प्रस्ताव येऊ शकतात, अनेक गोष्टींचे निराकरण देखील होऊ शकते. कुटुंबासोबत चांगला वेळ घालवाल. स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे लोक यश मिळवू शकतात. याने मंगळ तुमचे धैर्य आणि उत्साह वाढवेल. या काळात तुम्ही नवीन व्यवसाय किंवा नवीन नोकरी सुरू करू शकता.
मिथुन
राजभंग राजयोगाची निर्मिती मिथुन राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरेल. फेब्रुवारी महिन्यापर्यंत लोकांना विशेष लाभ मिळतील.आर्थिक लाभ होण्याची दाट शक्यता आहे, अनेकांना कर्जापासून मुक्ती मिळेल. नोकरीच्या ठिकाणी प्रगती साधाल. शौर्य, साहस आणि उत्साह वाढेल. नोकरदार लोकांसाठी काळ चांगला राहील, त्यांना पदोन्नती आणि वेतनवाढीचा लाभ मिळू शकतो. समाजात मान-सन्मान वाढेल. गुरूचा आशीर्वादही राहील. आर्थिक स्थिती मजबूत होईल. कोर्ट केसेसमध्ये यश मिळेल.