Ahmednagar News : वडिलांनी मुलांना विषारी औषध पाजलं, पत्नीसह गळफास घेतला, सहा वर्षाच्या चिमुरड्यास पाण्यात फेकले…क्षणात सगळं संपलं

Ahmednagarlive24 office
Published:
Ahmednagar News

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातून एक भयावह घटना समोर आली आहे. वडिलांनी मुलांना विषारी औषध पाजलं. त्यानंतर पत्नीसह स्वतः गळफास घेतला. यात नऊ वर्षांची मुलगी बचावली असून सहा वर्षांचा मुलाचा अंत झाला.

याघटनेने एक हसतं खेळतं कुटुंब क्षणात संपल. गजानन रोकडे, पौर्णिमा रोकडे, दुर्वेश रोकडे अशी मृतांची नावे आहेत. ही घटना अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील वारणवाडी येथे घडली.

चैताली रोकडे ही यांत बालंबाल बचावली असून तिच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गजानन रोकडे, पौर्णिमा रोकडे हे जुन्नर तालुक्यातील रहिवासी आहेत व ते पारनेर तालुक्यातील एका पतसंस्थेमध्ये नोकरी करत असल्याची माहिती मिळाली आहे.

अधिक माहिती अशी : हे रोकडे कुटुंब काल शुक्रवारी श्रीरामपूर तालुक्यातील सासूरवाडीला दुचाकीवरून चालले होते. पारनेर तालुक्यातील बारणवाडी शिवारात आल्यानंतर या दोघा पतिपत्नीत वाद झाले. गजानन याच्याकडे असलेला विषारी पदार्थ त्याने दोन्ही मुलांना पाजले पण त्याच दरम्यान मुलगी चैतालीने तेथून पळ काढला व त्यात बचावली.

गजानन याने सहा वर्षाच्या मुलाला पाण्यात फेकले व नंतर पत्नी पौर्णिमा हिला गळफास देऊन स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe