Best Sedan Cars : प्रीमियम फीचर्स आणि 31 Kmpl मायलेजसह येतात या CNG सेडान कार, किंमतही आहे खूपच कमी

Published on -

Best Sedan Cars : देशातील ऑटो मार्केटमध्ये कारच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे अनेक कार उत्पादक कंपन्या त्यांच्या नवनवीन कार सादर करत आहेत. तसेच त्यांच्या कारची उत्पादन क्षमता देखील वाढवत आहेत.

पेट्रोल आणि डिझेलच्या किमती गगनाला भिडल्याने अनेकजण CNG आणि इलेक्ट्रिक कारचा पर्याय निवडत आहेत. अनेकजण नवीन कार खरेदी करताना CNG कारचा पर्याय निवडत असल्याने कारच्या मागणीत प्रचंड वाढ झाली आहे.

तुम्हालाही उत्तम मायलेज देणारी CNG सेडान कार खरेदी करायची असेल तर ऑटो मार्केटमध्ये मारुती ते टाटाच्या कार उपलब्ध आहेत. या कारमध्ये प्रीमियम फीचर्स देण्यात आले आहेत. तसेच त्यांची किंमत देखील कमी आहे.

टाटा टिगोर सीएनजी

टाटा मोटर्सकडून त्यांच्या टिगोर सेडान कारमध्ये देखील सीएनजी इंजिन पर्याय देण्यात आला आहे. कारमध्ये 1199cc 3 सिलेंडर इंजिन दिले आहे. हे इंजिन 72 bhp पॉवर आणि 95 Nm टॉर्क निर्माण करते. टिगोर CNG कार 26.4 Kmpl मायलेज देण्यास सक्षम आहे. कारची एक्स शोरूम किंमत 7.80 लाख रुपयांपासून सुरू होते.

ह्युंदाई ऑरा सीएनजी

ह्युंदाई मोटर्सकडून देखील त्यांच्या अनेक सीएनजी कार भारतीय ऑटो मार्केटमध्ये सादर केल्या आहेत. ऑरा सेडान कारमध्ये देखील CNG पर्याय देण्यात आला आहे. ऑरा सेडान कारमध्ये 1197 cc इंजिन देण्यात आला आहे.

हे इंजिन 67.72 BHP पॉवर जनरेट करण्यास सक्षम आहे. कारमध्ये 402 लिटरची बूट स्पेस देण्यात आलिया आहे. कारची एक्स शोरूम किंमत 8.23 ​​लाख रुपयांपासून सुरू होते. ऑरा सीएनजी कार 22 Kmpl मायलेज देण्यास सक्षम आहे.

मारुती डिझायर सीएनजी

मारुती सुझुकीच्या डिझायर सेडान कारमध्ये देखील CNG पर्याय देण्यात आला आहे. मारुतीची डिझायर ही एक देशातील लोकप्रिय सेडान कार आहे. कारमध्ये 1197 सीसी इंजिन देण्यात आले आहे. डिझायर सीएनजी कार 31.12 Kmpl मायलेज देण्यास सक्षम आहे. कारची एक्स शोरूम किंमत 8.39 लाख रुपये आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe
Stay updated!