महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळात सुरु आहे भरती, ई-मेलद्वारे करा अर्ज !

Ahmednagarlive24 office
Published:
Maha IT Corporation Ltd Bharti 2024

Maha IT Corporation Ltd Bharti 2024 : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (MITC) अंतर्गत सध्या विविध पदांवर भरती सुरु असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. तुम्ही देखील एका चांगल्या नोकरीच्या शोधात असाल तर ही संधी तुमच्यासाठी उत्तम आहे. या भरती अंतर्गत कोणत्या जागा भरल्या जाणार आहेत, तसेच कोण येथे अर्ज करण्यास पात्र असले सविस्तर जाणून घेऊया.

महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (MITC) अंतर्गत “मुख्य तंत्रज्ञान अधिकारी (CTO)” पदाची 01 रिक्त जागा भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. येथे अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने सादर करायचा आहे. अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 15 जानेवारी 2024 आहे.

येथे अर्ज करण्यासाठी उमेदवार BE/B.Tech/M.Tech in Computer Science/Information Technology/Electronics/Electronics and Telecommunication किंवा सरकारी मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर असणे आवश्यक आहे. ही भरती मुंबई येथे होत असून, अर्ज rupali.gaikwad@mahait.org या ई-मेलद्वारे सादर करायचे आहेत.

ई-मेलद्वारे अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 15 जानेवारी 2024 असून, अर्ज देय तारखे अगोदर सादर करायचे आहे. भरती संबंधित अधिक माहिती हवी असल्यास https://mahait.org/ या अधिकृत वेबसाईटला भेट द्या

असा करा अर्ज

-या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने सादर करायचा आहे.
-अर्ज rupali.gaikwad@mahait.org या ई-मेलद्वारे सादर करायचे आहेत.
-ईमेलद्वारे अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 15 जानेवारी 2024 आहे.
-लक्षात घ्या अर्जासोबत आवश्यक कागदपत्राची प्रत जोडवी.
-येथे अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी एकदा भरती सूचना काळजीपूर्वक वाचावी.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe