भारतातील ‘या’ लोकप्रिय कारची किंमत तब्बल 64 हजारांनी वाढली, वाचा नवीन किंमती

Ahmednagarlive24 office
Published:
Car Price Hike

Car Price Hike : या नवीन वर्षात कार घेऊ इच्छिणाऱ्या लोकांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि थोडीशी धक्कादायक बातमी समोर आली आहे. खरंतर वर्ष 2024 साठी देशातील अनेक नामांकित कारनिर्मात्या कंपन्यांनी आपल्या लोकप्रिय गाड्यांच्या किमती वाढवण्याचा निर्णय घेतलेला आहे.

यामध्ये स्कोडा या कंपनीचा देखील समावेश होतो. या कंपनीने गेल्या वर्षातच पुढील वर्षी त्यांच्या काही लोकप्रिय मॉडेलच्या किमती वाढवल्या जातील असे जाहीर केले होते. यानुसार आता स्कोडाने आपल्या लोकप्रिय कारची किंमत वाढवण्याचा अधिकृत निर्णय घेतला आहे.

यामुळे कार घेऊ इच्छिणाऱ्या लोकांना मोठा फटका बसणार आहे. खरे तर या नवीन वर्षात कार घेण्याचे अनेकांचे स्वप्न आहेत. मात्र आता या लोकांचे हे स्वप्न महाग होणार आहे. स्कोडा इंडियाने भारतातील लोकप्रिय स्कोडा स्लाव्हिया सेडानच्या किंमती 14,000 ते 64,000 रुपयांनी वाढवल्या आहेत.

म्हणजेच व्हेरिएंटनुसार किमतीत वाढ करण्यात आली आहे. अशा परिस्थितीत आता आपण या लोकप्रिय कारची नवीन किंमत काय आहे याविषयी सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

लोकप्रिय कारच्या नवीन किंमती पहा

Skoda कंपनीकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार, कंपनीने या लोकप्रिय कारच्या बेस व्हेरिएंटची म्हणजे Active trim ची किमत 64,000 रुपयांनी वाढवली आहेत. आता हे बेस व्हेरियंट 10.89 लाख रुपयांऐवजी 11.53 लाख रुपयांना बाजारात उपलब्ध होणार आहे.

मात्र गाडीची ही एक्स शोरूम किंमत राहील ऑन रोड प्राईस यापेक्षा अधिक राहणार आहे. खरे तर कंपनीची ही लोकप्रियकार सेफ्टीसाठी खूपच उत्कृष्ट आहे. या कारमध्ये देण्यात आलेले सेफ्टी फीचर्स किमतीच्या तुलनेत खूपच फायदेशीर आहेत. हेच कारण आहे की या कारची भारतीय बाजारात मोठी विक्री होत आहे.

नुकत्याच जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार, स्कोडाने गेल्या 2 वर्षात भारतात 1 लाखांहून अधिक कार विकल्या आहेत. यामध्ये स्कोडा कुशाक आणि स्कोडा स्लाव्हियाने सर्वाधिक विक्री नोंदवली आहे. दरम्यान स्कोडा ही देशातील एक लोकप्रिय कारनिर्माता कंपनी लवकरच भारतात नवीन जनरेशन कोडियाक आणि ऑक्टाव्हिया एसयूव्ही लॉन्च करण्याच्या तयारीत असल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांमधून समोर आले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe