Ahmednagar News : कर्जत तालुक्यातील वायसेवाडी शिवारात पिकअप जीप आणि दुचाकी यांच्यात अपघात झाला. या अपघातात दुचाकीवरील एका युवकाचा मृत्यू झाला. ही घटना शनिवारी सायंकाळी घडली,
अनिकेत अजिनाथ राऊत वय (२० वर्षे) असे मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी, कर्जत तालुक्यातील वायसेवाडी शिवारात हा खेडकडून येणाऱ्या पिकअप आणि राशीनवरून खेडकडे चाललेल्या दुचाकी यांच्यात अपघात झाला.
या अपघातात अनिकेत अजिनाथ राऊत या युवकाचा मृत्यू झाला. अपघातानंतर नवनाथ हरिदास राऊत यांच्या फिर्यादीवरून पीकअपचालका विरोधात राशीन पोलीस दुरक्षेत्रामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक अमोल लोखंडे करीत आहेत.
कुटुंबामध्ये राहिल्या फक्त महिला
अनिकेतच्या आजोबांचा खूप दिवसापूर्वी मृत्यू झाला आहे. गेल्या वर्षी त्यांच्या वडिलांचा ही मृत्यू झाला असून घरात केवळ अनिकेत हाच एकमेव कर्ता पुरूष होता. मात्र दुर्दैवाने या अपघातात अनिकेतचा देखील मृत्यू झाल्याने आता घरात पुरुषच राहिला नाही. अनिकेतची आजी, आई, बहीण या महिलाच कुटुंबात राहिल्या आहेत.