FD Rates : सार्वजनिक क्षेत्रातील बँक युनियन बँक ऑफ इंडियाने मुदत ठेवींवरील व्याजदरात वाढ करून आपल्या ग्राहकांना न्यू ईयर गिफ्ट दिले आहे. बँकेने 2 कोटी रुपयांपेक्षा कमी कालावधीच्या एफडीवरील व्याजदरात 0.25 टक्क्यांनी वाढ केली आहे. युनियन बँकेच्या वेबसाइटनुसार, नवीन व्याजदर २७ डिसेंबरपासून लागू झाले आहेत.
युनियन बँक ऑफ इंडिया 7 दिवस ते 45 दिवसांच्या एफडीवर सर्वसामान्य नागरिकांना 3 टक्के व्याजदर देत आहे. तर 46 दिवस ते 90 दिवसांच्या दरम्यान परिपक्व होणाऱ्या FD साठी व्याज दर 4.05 टक्के आहेत. बँकांचे नवीन एफडी दर पुढीलप्रमाणे :-
बँकेचे 91 दिवस ते 180 दिवसांच्या दरम्यान परिपक्व होणाऱ्या FD साठी व्याज दर 4.30 टक्के आहे. त्याच वेळी, बँक 181 दिवसांपासून ते 1 वर्षापेक्षा कमी कालावधीच्या FD साठी 5.25 टक्के व्याज दर देत आहे. युनियन बँकेने 1 वर्ष ते 398 दिवसांच्या मुदतीच्या FD साठी व्याजदर 6.75 पर्यंत कमी केला आहे. युनियन बँकेने 399 दिवसांच्या एफडीसाठी व्याजदर 0.25 टक्क्यांनी वाढवून 7.25 टक्के केला आहे.
युनियन बँक 400 दिवसांपासून ते 3 वर्षांपेक्षा कमी कालावधीच्या FD वर 6.50 टक्के व्याजदर देत आहे. पूर्वी तो 6.30 टक्के होता. बँक 3 वर्ष ते 10 वर्षांच्या FD वर 6.70% पर्यंत व्याज दर देत आहे.
ज्येष्ठ नागरिकांसाठी व्याजदर
बँक ज्येष्ठ नागरिकांना सामान्य व्याजदरापेक्षा 0.50 टक्के अधिक व्याजदर देत आहे. युनियन बँक ऑफ इंडिया 7 दिवसांपासून ते 10 वर्षांपर्यंतच्या एफडीवर ज्येष्ठ नागरिकांना 3.50 टक्के ते 7.75 टक्के व्याजदर देत आहे.
अति ज्येष्ठ नागरिकांसाठी व्याजदर
युनियन बँक ऑफ इंडिया अति ज्येष्ठ नागरिकांना 0.75 टक्के अतिरिक्त व्याजदर देत आहे. सुपर ज्येष्ठ नागरिकांसाठी, 7 दिवसांपासून ते 10 वर्षांपर्यंतच्या FD वर 3.75 टक्के ते 8 टक्के व्याजदर असतो.