Hyundai Creta Facelift : ह्युंदाई मोटर्सकडून त्यांच्या लोकप्रिय क्रेटा एसयूव्ही कारचे फेसलिफ्ट मॉडेल बाजारात सादर केले आहे. लवकरच क्रेटा फेसलिफ्ट कार भारतात लाँच केली जाणार आहे. त्यामुळे ग्राहकांना एक आणखी एक प्रीमियम फीचर्स असलेली एसयूव्ही कार मिळणार आहे.
16 जानेवारी रोजी क्रेटा फेसलिफ्ट एसयूव्ही कार भारतात लॉन्च केली जाणार आहे. क्रेटा फेसलिफ्ट मोठ्या बदलांसह बाजारात सादर केली जाईल. कारमध्ये जबरदस्त सुरक्षा फीचर्स दिले जाणार आहेत. कंपनीकडून कारचा व्हिडीओ आणि स्केचेस जारी करण्यात आले आहेत.
ह्युंदाई क्रेटा फेसलिफ्ट एसयूव्ही कारची अनेकदा चाचणी देखील घेण्यात आली होती. चाचणी दरम्यान कारचे डिझाईन आणि काही फीचर्स देखील लीक झाले होते. कंपनीकडून लवकरच कारच्या किमती देखील जाहीर केल्या जातील.
क्रेटा फेसलिफ्ट डिझाइन
क्रेटा फेसलिफ्ट एसयूव्ही कारमध्ये अनेक बदल केल्याचे पाहायला मिळत आहे. कारच्या डिझाईनमध्ये सर्वात मोठा बदल करण्यात आला आहे. एसयूव्ही कारच्या मागणीतील वाढ लक्षात घेता ह्युंदाईने त्यांच्या क्रेटा एसयूव्ही कारचे अपडेटेड मॉडेल लाँच करणार आहे.
क्रेटा फेसलिफ्ट एसयूव्ही कारच्या पुढील बाजूस सर्व-नवीन लोखंडी जाळी, नवीन हेड लाइट युनिट, नवीन DRL, तसेच आकर्षक नवीन बंपर, नवीन अलॉय डिझाइन, नवीन टेल लाईट डिझाइन आहे, स्ट्रेच्ड लाइट बार असे अनेक बदल करण्यात आले आहेत.
क्रेटा फेसलिफ्ट बुकिंग तपशील
क्रेटा फेसलिफ्ट एसयूव्ही कारचे बुकिंग देखील सुरु करण्यात आले आहे. तुम्हाला देखील क्रेटा एसयूव्ही कारचे नवीन मॉडेल खरेदी करायचे असेल तर तुम्ही 25,000 रुपयांच्या टोकन रकमेवर ते बुक करू शकता. जवळच्या ह्युंदाई मोटर्सच्या डिलरशिपवर किंवा ह्युंदाईच्या अधिकृत वेबसाईटवरून तुम्ही ही कार खरेदी करू शकता.
ह्युंदाई क्रेटा फेसलिफ्ट व्हेरियंट आणि रंग पर्याय
ह्युंदाई मोटर्सकडून त्यांची क्रेटा फेसलिफ्ट एसयूव्ही कार E, EX, S, S(O), SX, SX Tech आणि SX(O) अशा सात व्हेरियंटमध्ये सादर केली जाणार आहे. कारमध्ये 6 मोनो-टोन आणि एक ड्युअल-टोन रंग पर्याय दिला जाणार आहे.