Ahmadnagar Loksabha Election : लोकसभेसाठी ठरलं बर ! खासदार सुजय विखेंविरोधात शंकरराव गडाख लढणार !

Ahmednagarlive24 office
Published:
Ahmadnagar Loksabha Election

Ahmednagar Politics News : येत्या काही महिन्यात महाराष्ट्रसहित संपूर्ण देशात लोकसभेच्या निवडणुकांचा थरार रंगणार आहे. विशेष म्हणजे लोकसभेच्या निवडणुका झाल्या की लगेचच आपल्या महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका देखील रंगणार आहेत. दरम्यान या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आत्तापासूनच वेगवेगळ्या राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे.

आपल्या महाराष्ट्रात देखील आगामी लोकसभेच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांनी आत्तापासूनच जय्यत तयारी सुरू केली आहे. निवडणुकीचे पडघम आत्तापासूनच वाजू लागले आहेत. सत्ताधारी पक्षाने पुन्हा एकदा सत्ता काबीज व्हावी यासाठी गेल्या काही दिवसात सर्वसामान्यांना खुश करण्यासाठी अनेक महत्वाचे निर्णय घेतले आहेत.

याशिवाय, इतरही पक्ष मतदारांना साधण्यासाठी जनसंपर्क वाढवत आहेत. याशिवाय लोकसभेच्या निवडणुकांसाठी आता उमेदवार फायनल करण्याचे काम देखील राजकीय पक्षांनी सुरू केले आहे.

खरे तर गेल्या काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने शिर्डीत याच पार्श्वभूमीवर शिबिराचे देखील आयोजन केले होते. यामुळे आता नगर दक्षिण आणि शिर्डी या अहमदनगर जिल्ह्यातील दोन लोकसभा मतदारसंघांसाठी कोणकोणते उमेदवार रिंगणात उतरणार याबाबत जाणून घेण्याची सर्वसामान्यांना उत्सुकता लागलेली आहे. राजकारणातील तज्ज्ञांचे देखील याकडे मोठे बारीक लक्ष राहणार आहे.

शंकरराव गडाख हे योग्य उमेदवार

दरम्यान याच बाबत शिवसेना ठाकरे गट प्रवक्ते संजय राऊत यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. राऊत यांनी म्हटल्याप्रमाणे नगर दक्षिणची जागा ही राष्ट्रवादीकडे आहे. या जागेसाठी शंकरराव गडाख हे अतिशय योग्य आणि प्रबल उमेदवार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

तसेच जागेच्या आदलाबदलीसंदर्भात अजून काहीही निर्णय झालेला नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. म्हणजे विरोधी पक्षातील नेत्यांनी नगर दक्षिणसाठी उमेदवार जवळपास फायनलाईज केला आहे. यामुळे आता शिर्डीतून शिवसेना ठाकरे गट यांच्याकडून कोण उभे राहणार हा मोठा सवाल आहे.

ठाकरे गट शिवसेनेत या जागेसाठी अनेक इच्छुक उमेदवार आहेत. अनेकांनी या जागेसाठी लोकसभा लढवण्याची इच्छा दबक्या आवाजात का होईना पण बोलून दाखवली आहे. काही ठिकाणी कार्यकर्त्यांच्या माध्यमातून त्यांच्या नेत्यांची नावे या जागेसाठी पुढे केली जात आहेत.

दरम्यान, शिर्डी लोकसभेतून कोण उभे राहू शकत याबाबत संजय राऊत यांनी देखील महत्वाची अपडेट दिली आहे. खरंतर आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संजय राऊत नाशिक दौऱ्यावर होते. दरम्यान हाच दौरा आटोपून ते शिर्डीत साई दर्शनासाठी देखील गेलेत.

यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी देखील संवाद साधला. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना टोला लगावला आहे. शिर्डी लोकसभेच्या उमेदवारीबाबत बोलतांना म्हटले की, ठाकरे गट वगैरे आम्ही मानत नाही, बाळासाहेबांनी शिवसेना स्थापन केली तेव्हा एकनाथ शिंदे गोधडीत असतील.

तसेच शिर्डी लोकसभेच्या जागेसाठी शिवसेनेकडे (ठाकरे गट) इच्छुकांची संख्या वाढत आहे म्हणजे मुळ शिवसेनेकडे ताकद असल्याचे राऊत यांनी यावेळी अधोरेखित केले आहे.

मात्र शिर्डीतून कोण उभे राहणारे याबाबत राहू त्यांनी कोणतीच माहिती दिलेली नाही. परंतु जेव्हा राऊत नासिक वरून शिर्डीत पोहोचले तेव्हा त्यांच्या स्वागतासाठी जी व्यक्ती पहिली उभी होती तीच व्यक्ती शिर्डीतन लोकसभा लढवण्याची दाट शक्यता असल्याचे नगरच्या राजकारणात बोलले जात आहे.

शिर्डीत संजय राऊत यांच्या स्वागतासाठी प्रभावती घोगरे उपस्थित होत्या. यामुळे प्रभावती जी विखे पाटलांविरोधात लोकसभेसाठी उभ्या राहणार असे बोलले जात आहे. पण, याबाबत ठाकरे गटाकडून कोणतीच माहिती समोर आलेली नसल्याने शिर्डी लोकसभेसाठी ठाकरे गटाकडून कोणता उमेदवार उभा राहतो ? हे पाहणे आता विशेष उत्सुकतेचे राहणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe