Toyota Upcoming Cars : टोयोटा कार उत्पादक कंपनीकडून त्यांच्या आगामी काळात अनेक नवनवीन कार लॉन्च केल्या जाणार आहेत. त्यामुळे नवीन कार खरेदीदारांना आणखी कारचा पर्याय उपलब्ध होणार आहे. टोयोटाकडून त्यांची कार देखील सादर केली जाणार आहे.
टोयोटाकडून 18 महिन्यात त्यांच्या तीन नवीन कार सादर केल्या जाणार आहेत. टोयोटाने त्यांची इलेक्ट्रिक कार अद्याप भारतात सादर केलेली नाही. आता टोयोटाकडून इलेक्ट्रिक कार लाँच करण्यासाठी काम सुरु केले आहे.
टोयोटा Taisor
टोयोटा कार उत्पादक कंपनीकडून त्यांची मारुती सुझुकी Fronx कारवर आधारित Taisor एसयूव्ही कार लॉन्च केली जाणार आहे. टोयोटा Taisor एसयूव्ही कार याचवर्षी लॉन्च केली जाणार आहे. कारमध्ये Fronx कारसारखेच इंजिन पर्याय दिले जाणार आहेत.
7 सीटर टोयोटा हायरायडर
टोयोटाची स्वस्त आणि दमदार मायलेज देणारी हायरायडर 5 सीटर कार आता 7 सीटर पर्यायासह भारतात लॉन्च केली जाणार आहे. Y17 या कोडनेम नावाने टोयोटाने या कारचे काम सुरु केले आहे. 2025 पासून कारचे उत्पादन सुरु करण्यात येईल.
टोयोटा हायरायडर एसयूव्ही कारमध्ये पेट्रोल, सीएनजी आणि हायब्रीड इंजिन पर्याय देण्यात आला आहे. कारच्या व्हीलबेस आणि किमतीमध्ये बदल केले जातील. तसेच काही कॉस्मेटिक बदल देखील कारमध्ये केले जातील.
टोयोटा कोरोला क्रॉस
टोयोटा कार निर्मात्या कंपनीकडून त्यांची कोरोला क्रॉस एसयूव्ही कार 2025 मध्ये लॉन्च केली जाणार आहे. टोयोटा कार कंपनीकडून त्यांची नवीन कोरोला क्रॉस एसयूव्ही कार नवीन प्लांटमध्ये तयार केली जाईल. ही कार TNGA-C प्लॅटफॉर्मवर विकसित केली जाईल.
कोरोला क्रॉस ही एक 7 सीटर कार असेल. टोयोटाची ही नवीन कोरोला क्रॉस 7 सीटर कार मोठ्या फॅमिलीसाठी उत्तम पर्याय ठरेल. कंपनीकडून कारबाबत लवकरच अधिकृत माहिती जाहीर केली जाईल.