मोलकरणीनेच भावाच्या मदतीने डॉक्टरचे घर केले साफ…?

Published on -

अहमदनगर : मोलकरणीने आपल्या भावाच्या मदतीने ज्या डॉक्टरच्या घरी काम करत होती. त्याच डॉक्टरच्या घरात धाडसी चोरी केली. यात ४० लाख रुपये रोख व १४ तोळ्यांचा ७ लाखांचा सोन्याचा हार, असा एकूण ४७ लाखांचा मुद्देमाल लंपास केला होता.

मात्र पोलिसांनी या बहीण-भावास अटक केली आहे. ही घटना श्रीरामपूर शहरातील डॉ.ब्रम्हे यांच्या घरी घडली होती. जाबीर रशिद शेख, हिना राजू सय्यद असे अटक केलेल्या बहिण भावाचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, श्रीरामपूर शहरातील डॉ. प्रफुल्ल बाळकृष्ण ब्रम्हे यांच्या राहत्या घरी अज्ञात चोरट्यांनी तोंडाला रुमाल लावून गच्चीवरील लोखंडी खिडकीचे गज कापुन घरात प्रवेश केला होता. चोरट्यांनी डॉ. ब्रम्हे यांचे हातपाय बेडशीटने बांधुन व मुलगा डॉ. चिन्मय याच्या खोलीच्या दरवाजाची बाहेरुन कडी लावली होती.

त्यानंतर घरातील लोखंडी कपाट हत्याराने वाकवून त्यातील ४० लाख रुपये रोख व १४ तोळ्यांचा ७ लाखांचा सोन्याचा हार, असा एकूण ४७ लाखांचा मुद्देमाल चोरून नेला होता. याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

पोलीस निरिक्षक हर्षवर्धन गवळी यांनी मिळवलेल्या माहितीवरून जाबीर रशिद शेख (वय ३२, रा. कन्नड, जि. छत्रपती संभाजीनगर) याने गुन्हा केल्याचे समोर आले. दरम्यान तो दि. ६ जानेवारीला त्याच्या गावातील एका लग्नात येणार असल्याची माहिती मिळाली. त्यामुळे पोलिसांनी त्याच्या राहत्या घरातून त्याला ताब्यात घेतले.

त्याच्याकडे विचारपूस केली असता, त्याने हा गुन्हा त्याची बहीण हिना राजु सय्यद तसेच इतर दोन साथीदार गौसखॉँ हनिफखॉँ पठाण ऊर्फ गौश्या, इरफान इब्राहिम पठाण यांच्या समवेत केल्याची कबुली दिली. पोलिसांनी आरोपींकडून चोरी गेलेल्या मुद्देमालापैकी १९ लाख ७ हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!