Ahmednagar News : नागवडेंना आमदारकीचा ध्यास, पण सध्या कुणाचाच मिळेना प्रतिसाद ! मातब्बर नेत्यांची नागवडेंना साथ नाही? पहा काय घडतंय

Ahmednagarlive24 office
Published:
Ahmednagar News

Ahmednagar News : नागवडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे सध्या येणाऱ्या विधानसभेसाठी इच्छुक असल्याचे दिसते. श्रीगोंदे मतदार संघात निवडणूक लढवण्यास ते तयार आहेत. त्यादृष्टीने ते तयारी करत आहेत. काही झाले तरी ते विधानसभा लढवणारच आहेत,

परंतु सध्या त्यांना साथ कुणाची मिळत नसल्याचे दिसते. त्यांनी स्वतःच याबाबत वक्तव्य केले आहे. पत्रकार दिनाच्या कार्यक्रमात बोलताना नागवडे म्हणाले की, २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत काही झालं तरी अनुराधा नागवडे यांना

निवडणुकीत उतरवणार व कोणत्याही परिस्थितीत विधानसभा लढवणारच असल्याचे ते म्हणाले. सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक स्व. शिवाजीराव नागवडे यांनी हयात असताना तालुक्यातील

सर्व नेत्यांना मदत करत आमदार केले परंतु आम्हाला आतापर्यंत विधानसभा निवडणुकीत कोणीही मदत केली नसल्याची खंत त्यांनी बोलून दाखवली. परंतु यंदा मात्र कोणत्याही परिस्थितीत विधानसभा लढवणारच असा निर्धार त्यांनी बोलून दाखवला.

आणखी काय म्हणाले नागवडे

नागवडे म्हणाले, महाविद्यालयात बापूंनी कशाप्रकारे उभारणी केली हे आपण सर्वानी पाहिले असून उद्याच्या काळात या संस्थेचे नाव कसे मोठे होईल यासाठी आम्ही काम करत आहोत. सहकार टिकला तर शेतकरी टिकेल तालुक्यातील

शेतकऱ्यांनी सहकारी कारखान्याला ऊस द्यावा अन्यथा सर्व सामान्य शेतकरी उसाच्या शेतीपासून दूर जाईल असेही ते म्हणाले. यावेळी मात्र त्यांच्या आमदारकीच्या निर्धाराची चर्चा होती.

इतरांची साथ मिळणार का?

स्व. शिवाजीराव नागवडे जयंतीनिमित्त १९ तारखेला उपमुख्यमंत्री अजित पवार येणार असून पुढील दृष्टीने नागवडे याठिकाणी राजकीय पेरणी करतील असे दिसते. परंतु नागवडे यांना सर्वपक्षीयांची साथ मिळणार का?

तेथे भाजपचे आ. पाचपुते हे स्टँडिंग उमेदवार आहेत त्यांचे उमेदवारीचे काय होणार? जरी नागवडे यांना तिकीट मिळाले तरी पाचपुते समर्थक नागवडेंचे काम करतील का? असे अनेक प्रश्न सध्या जनतेला पडले आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe