Ahmednagar Crime News : अहमदनगर शहरात चोऱ्यांचे प्रकार वाढले आहेत. धार्मिक स्थळी चोऱ्या होण्याची संख्याही वाढली आहे. नुकतेच शहरातील माळीवाडा येथील शंकरबाबा सावली मठातून दानपेटी चोरून नेल्याची घटना घडली होती.
पोलिसांनी आरोपीला बेड्या घातल्या आहेत व त्यानंतर घडलेला घनकर्म पाहून पोलिसही अवाक झाले आहेत. रोहिदास उर्फ रावश्या लक्ष्मण पलाटे (वय ३८, रा.मिरी माका ता.नेवासा) असे आरोपीचे नाव असून त्याला अटक केली आहे.
आरोपीने ही दानपेटी चोरी केली एका पडक्या खोलीत घेऊन गेला. आवाज होईल म्हणून त्याने पेटी न फोडता च्युईंगमने नोटा बाहेर काढल्या. साधारण दोन ते अडीच हजार रुपये त्याला यातून मिळाले व त्याने हे पैसे घेऊन त्याने मटक्याची उधारी मिटवली.
त्यानंतर तो घरी जाऊन झोपला होता. पोलिसांनी घरी जात त्याला ताब्यात घेतले. अधिक माहिती अशी : रविवारी (दि. ७) पहाटेच्यावेळी माळीवाडा परिसरातील शंकरबाबा सावली मठातील दानपेटी चोरी झाली. पोलिसांनी घटनास्थळी भेट देत तपासाची चक्रे फिरवली.
मंदिर परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासत सूत्रे हलवली. यात एका इसमाचा शोध लागला. तो नेवासा तालुक्यातील मिरीमाका गावातील असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर पोलिसांचे एक पथक तत्काळ गावात गेले. राहत्या घरातून पोलिसांनी आरोपाला ताब्यात घेत त्याच्याकडे अधिक चौकशी केली. त्याने गुन्ह्याची कबुली दिली असून घटनेची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी नगरमधील भगत गल्ली येथून दान पेटी जप्त केली.