Ajit Pawar Vs Rohit Pawar : सध्या आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्ष जनसंपर्क वाढवण्यात व्यस्त आहेत. आता नेतेमंडळी जनसामान्यांमध्ये आपले विजन घेऊन पोहचू लागले आहेत.
मतदारांना खुश करण्यासाठी राजकीय नेतेमंडळींनी आतापासूनच प्रयत्न सुरू केले आहेत. यामुळे राज्याचे राजकीय वातावरण पूर्णपणे तापलेले आहे. अशातच आता रोहित पवारांनी काका अजित पवारांवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
खरे तर राष्ट्रवादीत उभी फूट पडल्यानंतर म्हणजेच अजित दादा आणि काही आमदारांनी राष्ट्रवादी पक्ष सोडून सत्तेत सामील होण्याचा निर्णय घेतल्यानंतर रोहित पवार आणि अजित पवार यांच्यामध्ये शाब्दिक युद्ध सुरू झाले आहे. दोघांमध्ये आरोप-प्रत्यारोप सूरु आहेत.
दरम्यान आता अजित पवारांच्या एका टीकेवर रोहित पवारांनी जोरदार हल्ला चढवला आहे. खरे तर नुकत्याच काही दिवसांपूर्वी अजित दादांनी रोहित पवारांवर टीका केली होती. रोहित पवारांच्या एका वक्तव्यावर बोलताना अजितदादांनी रोहित अजून बच्चा आहे असे म्हटले होते.
दरम्यान याच टीकेवर रोहित पवारांनी देखील अजित पवारांवर शाब्दिक हल्ला केला आहे. रोहित पवारांनी बच्चे मन के सच्चे असं म्हणत मी अजितदादांसाठी अजूनही बच्चाच आहे कारण की ते माझे काका आहेत असे म्हटले आहे.
तसेच अजित दादा नेहमीच सगळ्यांच्या वयावर बोलतात कधी ते मला बच्चा म्हणतात तर कधी साहेबांना अर्थातच शरद पवारांचे वय झाले आहे असे म्हणतात. मात्र ते नरेंद्र मोदी यांच्या वयावर कधी बोलत नाहीत, मोदी आता लवकरच 80 वर्षाचे होणार आहेत,
मग नरेंद्र मोदी यांनी देखील राजकारणातून बाहेर जावं असं म्हणण्याची हिंमत अजित दादांमध्ये आहे का ? असा सवाल रोहित पवारांनी केला आहे. एकंदरीत राष्ट्रवादीत उभी फूट पडल्यानंतर काका पुतण्यांमध्ये सुरू झालेले शाब्दिक युद्ध आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अजून तीव्र होण्याची शक्यता आहे. याचाच एक भाग म्हणून रोहित पवारांनी आता अजित पवारांवर हा जोरदार हल्ला चढवला आहे.