रेल्वेच्या कामामुळे दहा दिवसांपासून ती १४ गावे तहानलेली दोन दिवसात पाणीपुरवठा सुरळीत न केल्यास आंदोलनाचा इशारा

Updated on -

Ahmednagar News : दौंड – मनमाड रेल्वेमार्गाच्या दुहेरीकरणाच्या सुरु असलेल्या कामामुळे विळद (ता.नगर) येथील पुलाजवळ बुऱ्हाणनगर पाणी योजनेची जलवाहिनी फुटल्यामुळे या योजनेवर असलेल्या १४ गावांचा पाणी पुरवठा गेल्या दहा दिवसांपासून बंद आहे.

याबाबत जि.प.सदस्य संदेश कार्ले व डॉ.दिलीप पवार यांनी भर पावसात थेट विळदला जावून पाहणी करत रेल्वेच्या ठेकेदाराची भेट घेत येत्या दोन दिवसांत पाणी पुरवठा सुरळीत करून द्या, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

तसेच पंचायत समिती व जिल्हा परिषदेचे प्रशासक इतर सर्व योजना राबवते मात्र लोकहीताचे काम पाहायला त्यांना वेळ नाही. अशी परिस्थिती सध्या तालुक्यात आणि जिल्ह्यात पाहायला मिळत आहे. हे दुर्दैव असल्याची खंत संदेश कार्ले व्यक्त केली.

जलवाहिनी फुटल्याने बुऱ्हाणनगर पाणी पुरवठा योजनेतील सुमारे हिंगणगाव, खारे कर्जुने , निंबळक सह चौदा गावांचा पाणी पुरवठा गेल्या आठ दहा दिवसापासून बंद आहे. अशा तक्रारी या गावातील लोकांनी प्रशासनाकडे केल्या परंतु प्रशासनाने त्यावर कोणतीही कार्यवाही केली नाही. त्यामुळे या चौदा गावातील लोकांनी संदेश कार्ले यांना माहिती दिली.

कार्ले यांनी तत्काळ विळद येथील रेल्वेच्या पुलाच्या कामावर जाऊन सदर ठिकाणी भर पावसात पाहणी करून रेल्वेच्या ठेकेदाराला काम लवकर करण्याच्या सूचना दिल्या. यावेळी त्यांच्या समवेत पंचायत समितीचे माजी उपसभापती डॉ. दिलीप पवार, नितीन भांबळ, दत्ता खताळ आदी उपस्थित होते.

यावेळी काँक्रिटचे काम वर आल्यावर पाईप टाकता येणार आहे. पावसाने बाजूची माती खाली ढासळत असल्याने अडचण येत आहे. तरी येत्या दोन दिवसांत जलवाहिनी दुरुस्तीचे काम केले जाईल, त्या नंतर पाणी पुरवठा सुरळीत होईल असे यावेळी सांगण्यात आले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News