Maharashtra Rain : महाराष्ट्रात पावसाची एंट्री! आजही ह्या ठिकाणी पडणार पाउस…

Published on -

Maharashtra Rain : राज्यात अनेक भागांत ढगाळ हवामान असून, मंगळवारी मध्य महाराष्ट्र, कोकण तसेच इतर भागांत पावसाच्या हलक्या सरी पडल्या. दरम्यान, बुधवारी कोकण, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

सध्या अरबी समुद्रावर हवेची चक्रीय स्थिती आहे. त्यामुळे पूर्वेकडून आर्द्रतायुक्त वारे येत आहेत. तसेच राज्याच्या दिशेने थंड वारे वाहत आहेत. त्यामुळे महाराष्ट्रावर ते एकत्र येऊन पावसाला अनुकूल स्थिती निर्माण झाली आहे. राज्यातील काही भागांत मंगळवारी पावसाने हजेरी लावली. तर अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण होते.

कोकणातील रामेश्वर, कणकवली, देवगड, वैभववाडी, रत्नागिरी जिल्ह्यातील खेड, गुहागर आणि राजापूर आदी भागात हलका पाऊस पडला. मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, नाशिक, जळगाव जिल्ह्यातील काही भागांत हलक्या सरी पडल्या. महाबळेश्वरमध्ये ८ मिमी पावसाची नोंद झाली, अहमदनगर येथे ८ मिमी पावसाची नोंद झाली.

बुधवारी पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, जळगाव, नाशिक, नगर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड या जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरणासह काही ठिकाणी हलक्या सरीही पडतील, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe