Ahmednagar News : सुशिक्षित नोकरदारांत मोबाईलही ठरतोय घटस्फोटाचे कारण ! वर्षभरात ३०३ घटस्फोट

Published on -

Ahmednagar News : जग जसजसं प्रगती करत आहे, विविध संशोधन समोर येत असताना दुसरीकडे त्यांचे दुष्परिणामही समोर येत आहेत. आता मोबाईल हा सर्वसामान्यांच्या गरजा पूर्ण करणारे साधन आहे. परंतु हाच मोबाईल आता घटस्फोटाचे कारण बनत असल्याचे समोर आले आहे.

मोबाइलमुळे नवरा- बायकोमध्ये वितुष्ट निर्माण होऊन कौटुंबिक वाद वाढत आहेत. मागील वर्षभरात ३०३ जणांचे घटस्फोट झाले आहेत. धक्कादायक म्हणजे वाद टाळण्यासाठी एकमेकांच्या संमतीने घटस्फोट घेणाऱ्यांची संख्या सर्वाधिक आहे.

दोघेही नोकरदार, अभिमान, स्वाभिमान आडवा येतो

काही प्रकरणात असे आढळून आले आहे की, लग्न झाल्यानंतर काही दिवस सुखाचे जातात. त्यानंतर वैचारिक मतभेद सुरु होतात. एखाद दुसरे मुलं झाले की, अभिमान, स्वाभिमान जागा होतो. वादविवाद सुरू होतात अन् प्रकरण घटस्फोटापर्यंत जाते.

पती आणि पत्नी दोघे शिकलेले असल्याने कोणीही माघार घेत नाही. गरीब घरातील पती-पत्नी असो किंवा उच्चभ्रू कुटुंबातील सर्वच ठिकाणी असे प्रकार निदर्शनास येत आहेत. पती-पत्नी दोघेही नोकरीला आहेत, चांगला पगार आहे.

मात्र, मुले झाली तरी किरकोळ कारणावरून विचार जुळत नसल्याने घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला जातो. न्यायालयीन वाद टाळण्यासाठी एकमेकांच्या संमतीने कौटुंबिक न्यायालयात घटस्फोट घेणाऱ्यांची संख्या मोठी आहे.

एकमेकांच्या संमतीने घटस्फोट

सध्या एकमेकांच्या संमतीने घटस्फोट घेण्याचे प्रमाण जास्त दिसते. कौटुंबिक न्यायालयात अर्ज दाखल केल्यानंतर कोणताही वाद न घालता एकमेकांच्या संमतीने घटस्फोट घेतला जात आहे. हे असले प्रकार आता खेड्यातही होत आहेत. गेल्या वर्षभरात ४५ प्रकरणांत न्यायालयाने घटस्फोटाचा निर्णय दिला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe