Stock To Buy : शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी एक कामाची बातमी आहे. खरंतर शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना दीर्घ कालावधीसाठी गुंतवणूक करावी असा सल्ला दिला जातो. बाजारात दीर्घ कालावधीसाठी पैसा लावला तर गुंतवणूकदारांना जोरदार रिटर्न मिळण्याची शक्यता असते. मात्र बाजारात असेही काही स्टॉक आहेत जे अल्पकालावधीतच गुंतवणूकदारांना चांगला परतावा देण्यास सक्षम आहेत.
दरम्यान आज आपण शेअर बाजारातील अशा काही स्टॉक्स बाबत जाणून घेणार आहोत ज्यामध्ये पैसा लावला तर अल्पकालावधीतच गुंतवणूकदारांचा पैसा मोठा होणार आहे. शेअर बाजारातील तज्ञांनी अशा तीन स्टॉक ची माहिती दिलेली आहे ज्यामध्ये गुंतवणूकदारांनी गुंतवणूक केली तर त्यांना चांगला परतावा मिळू शकणार आहे. आज आपण शेअर बाजार तज्ञ नागराज शेट्टी आणि नुरेश मेराणी यांनी गुंतवणुकीचा सल्ला दिलेल्या तीन स्टॉकबाबत थोडक्यात माहिती पाहणार आहोत.
ग्रॅन्युल्स इंडिया : शेअर बाजारातली लिस्टेड असलेली ही कंपनी आगामी काही दिवसात गुंतवणूकदारांना चांगला परतावा देईल असा दावा शेअर बाजार तज्ज्ञ नुरेश मेराणी यांनी केला आहे. ग्रॅन्युल्स इंडिया या कंपनीच्या शेअर्समध्ये येत्या काही दिवसात तेजी येण्याची शक्यता आहे. परिणामी नूरेश यांनी या शेअरला बाय रेटिंग दिलेली आहे. या शेअर्सची किंमत 450 रुपयांवर पोहोचणार असे त्यांनी सांगितले असून यासाठी चारशे रुपयांचा स्टॉप लॉस दिला आहे. सध्या हा शेअर बाजारात 403 रुपयांवर ट्रेड करत आहे.
बोरोसिल रिन्युएबल : स्टॉक मार्केट मधला हा स्टॉक देखील लवकरच आपल्या गुंतवणूकदारांना मालामाल बनवेल अशी शक्यता आहे. शेअर बाजार तज्ज्ञ नागराज शेट्टी यांनी या स्टॉक वर विश्वास दाखवला आहे. त्यांनी बोरोसिल रिन्युएबलच्या शेअर्सला बाय रेटिंग दिली आहे. म्हणजे याला खरेदी करण्याचा सल्ला त्यांच्याकडून देण्यात आला आहे. सध्या बाजारात हा स्टॉक 517 रुपयांवर ट्रेड करत आहे. मात्र लवकरच हा 535 रुपयांचा टप्पा गाठणार असून हा स्टॉक खरेदी करावे असे त्यांनी सांगितले असून यासाठी 495 रुपयाचा स्टॉप लॉस देण्यात आला आहे.
संवर्धना मदरसन इंटरनॅशनल : हा देखील शेअर आपल्या गुंतवणूकदारांना अल्प कालावधीत मालामाल बनवणार असा विश्वास काही तज्ञांनी व्यक्त केला आहे. शेअर बाजार तज्ज्ञ नागराज शेट्टी यांनी या स्टॉक वर विश्वास दाखवला आहे. त्यांनी हा स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला गुंतवणूकदारांना दिला आहे. सध्या हा स्टॉक 107 रुपयांवर ट्रेड करत असून लवकरच हा स्टॉक 113 रुपयांवर जाईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला असून यासाठी 103 रुपयांचा स्टॉप लॉस देण्यात आला आहे.