Ahmednagar News : साखर ही गोडच असते मात्र विखेंची साखर सर्वांना गोड लागेल असे नाही ती साखर काही लोकांना कडुच लागेल. कारण आम्ही पैशासाठी राजकरण करत नाहीत.
असा उपरोधक टोला खासदार सुजय विखे पाटील यांनी विरोधकांना लगावला . नगर तालुक्यात राम मंदिर लोकार्पण सोहळा निमित्ताने नागरिकांना साखर वाटप व विविध विकास कामाचे भमिपूजन कार्यक्रमात ते बोलत होते .
यावेळी अहमदनगर जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजीराव कार्डिले, युवा नेते प्रतापसिंह पाचपुते, भाजपा तालुकाध्यक्ष दिपक कार्ले, बाजार समितीचे चेअरमन भाऊसाहेब बोठे , व्हाईस चेअरमन रभाजी सुळ , संचालक सुभाष निमसे , भाऊ भोर गुरुजी , भाऊसाहेब ठोंबे, मंजाबापू घोरपडे , सुधीर भापकर , संजय गिरवले आदीसह ग्रामस्थ उपस्थित होते .
खासदार विखे पाटील पुढे म्हणाले की, आम्ही पैशासाठी राजकरण करत नाहीत . आम्ही टक्केवारी घेत नाहीत. त्यामुळे होणारी काम दर्जेदार होतात . आम्ही समाजासाठी जेवढे वाटतो त्यापेक्षा अधिक पटीने आमची झोळी भरत रहाते .
जिल्हा बँकेचे अध्यक्ष कार्डिले म्हणाले कि श्री राम प्रभुच्या आशीर्वादाने आपणच पुन्हा खासदार होणार . नगर तालुक्यातील चिचोंडी पाटील मध्ये मारुती मंदीरासमोरील सभामंडपा साठी लवकरच ५० लाखाचा निधी देणार असल्याचे आश्वासन दिले.