Hill Station Near Ayodhya:- भारताचा विचार केला तर भारताला निसर्गाने भरभरून दिले असून उत्तरेपासून तर थेट दक्षिणेपर्यंत आणि पूर्वेपासून तर पश्चिमेपर्यंत प्रत्येक राज्यामध्ये निसर्गांने नटलेले अनेक पर्यटन स्थळे आणि हिलस्टेशन आहेत. त्यामुळे दरवर्षी लाखोंच्या संख्येने परदेशी पर्यटकांची देखील भारतामध्ये मोठ्या प्रमाणावर हजेरी लागते.
भारतामध्ये प्रत्येक राज्यात निसर्गाने भरभरून दिले असल्यामुळे पर्यटन स्थळांची भारतात कमी नाही. याच मुद्द्याला धरून जर आपण अयोध्याचा विचार केला तर या अयोध्येच्या आजूबाजूला देखील अनेक सुंदर अशी हिल स्टेशन आहेत. सध्या अयोध्या हे राम मंदिराच्या उद्घाटनासाठी खूप मोठ्या प्रमाणावर चर्चेत असून अयोध्यामध्ये बांधल्या गेलेल्या श्रीराम मंदिराचे उद्घाटन 22 जानेवारी 2024 रोजी होणार आहे.
त्यामुळे या उद्घाटन सोहळ्यासाठी भारतातून अनेक रामभक्त देशाच्या कानाकोपऱ्यातून या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर जाण्याची शक्यता देखील आहे. त्यामुळे जर तुम्हाला देखील अयोध्यामध्ये रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी जायचे असेल तर तुम्ही या कार्यक्रमांसोबतच अयोध्येतील काही चांगल्या अशा सर्वोत्तम हिल स्टेशनला देखील भेट देऊ शकतात. त्यामुळे आपण या लेखात आयोध्याच्या जवळ असलेल्या सर्वात सुंदर आणि आकर्षक अशा हील स्टेशनबद्दल माहिती घेणार आहोत.
आयोध्यातील प्रसिद्ध हिल स्टेशन
1- नैनिताल– उत्तराखंडच्या सुंदर खोऱ्यामध्ये नैनीताल हे वसलेले असून हे ठिकाण स्वर्गापेक्षा कमी नाही असे म्हटले जाते. हे उत्तराखंडचे एक महत्त्वाची हील स्टेशन असून या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर भेट देतात. या ठिकाणी असलेले उंच उंच टेकड्यांचे मनमोहक सौंदर्य तसेच तलाव धबधबे,
देवदार वृक्षाची झाडे आणि हिरवी गवताचे मैदाने नैनितालच्या सौंदर्यामध्ये मोठ्या प्रमाणावर भर घालतात. आणि तुम्ही नैनी तलाव, नैना देवी मंदिर तसेच केव्ह गार्डन सारख्या ठिकाणांचा आनंद घेऊ शकतात. तसेच या ठिकाणी तुम्ही ट्रेकिंग व पॅराग्लायडिंगचा देखील आनंद मिळवू शकतात. हे ठिकाण अयोध्येपासून पाचशे बत्तीस किलोमीटर अंतरावर आहे.
2- पोखरा– पोखरा हे ठिकाण त्याच्या सुंदरतेसाठी खूप प्रसिद्ध असून या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर परदेशी पर्यटक देखील भेट देतात. हे सुंदर शहर असून अप्रतिम नैसर्गिक सौंदर्य तसेच मनमोहक तलाव, तुमचं तुमचं पर्वत शिखरे आणि शांत वातावरणाकरिता नेपाळमध्ये प्रसिद्ध आहे व हे आयोध्यापासून साधारणपणे 352 किलोमीटर लांब आहे.
3- भरतपूर– भरपूर हे समुद्रसपाटीपासून 208 मीटर उंचीवर असलेले सुंदर शहर असून नेपाळचे एक आकर्षक असे हिल स्टेशन म्हणून देखील प्रसिद्ध आहे. भरपूर शहराचे वैशिष्ट्य म्हणजे हे चारही बाजूंनी डोंगरांनी वेढलेले आहे.
काठमांडू आणि पोखरानंतर नेपाळमधील हे तिसरे सर्वात जास्त लोकसंख्येचे शहर असून भरतपूर हे त्याच्या आदरातिथ्यासाठी देखील ओळखले जाते. भरपूर शहराच्या जवळ असलेल्या चितवन राष्ट्रीय उद्यानात तुम्ही जंगल सफारीचा आनंद घेऊ शकतात. हे ठिकाण आयोध्या पासून फक्त तीनशे सहा किलोमीटर अंतरावर आहे.
त्यामुळे तुम्ही रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमासोबतच या जवळ असलेल्या हिल स्टेशनचा देखील आनंद घेऊ शकतात.