FD Interest Rate : सध्या मोठ्या प्रमाणात गुंतवणूकदार एफडी मध्ये गुंतवणूक करण्यास प्राधान्य देत आहेत, याचे सर्वात मोठे कारण म्हणजे देशातील जवळ-जवळ सर्वच बँका एफडीवर जबरदस्त परतावा देत आहेत, आज आम्ही अशाच बँकाबद्दल सांगणार आहोत ज्या, आपल्या गुंतवणूकदारांना सर्वाधिक व्याजदर ऑफर करत आहे.
एफडी ही सर्वात सुरक्षित गुंतवणूक मानली जाते तसेच त्यातून नियमित उत्पन्नही मिळते. अशा प्रकारची बचत तुमच्या वाईट काळात तुम्हाला कधीही उपयोगी पडू शकते. म्हणूनच नागरिकांना एफडीमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला जातो. आज आपण आजच्या या बातमीद्वारे कोणत्या बँका एफडीवर बक्कळ परतावा देत आहेत, याबद्दल जाणून घेणार आहोत.
बँक ऑफ बडोदा
बँक ऑफ बडोदा तीन वर्षांच्या FD वर 7.75 टक्के व्याजदर देते. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये ज्येष्ठ नागरिकांना सर्वाधिक व्याज दिले जाते. तुम्ही आता या एफडीमध्ये 1 लाख रुपये गुंतवले तर तीन वर्षांत ते 1.26 लाख रुपये होईल. तुम्ही तीन वर्षातच या एफडीवर बक्कळ कमाई कराल.
Axis Bank
Axis Bank ज्येष्ठ नागरिकांना तीन वर्षांच्या FD वर 7.60 टक्के व्याजदर देत आहे. या बँकेत आता 1 लाख रुपये गुंतवल्यास, तुमची रक्कम तीन वर्षांत 1.25 लाख रुपये होईल.
HDFC, ICICI आणि पंजाब नॅशनल बँक
HDFC बँक, ICICI बँक आणि पंजाब नॅशनल बँक तीन वर्षांच्या FD वर 7.50 टक्के व्याजदर देत आहेत. तुम्ही येथे 1 लाख रुपये गुंतवल्यास ही रक्कम तीन वर्षांत 1.25 लाख रुपये होईल.
कॅनरा बँक
कॅनरा बँक तीन वर्षांच्या एफडीवर ज्येष्ठ नागरिकांना ७.३० टक्के व्याज देत आहे. जर तुम्ही आज येथे गुंतवणूक केली तर तुम्हाला एका वर्षात 1.24 लाख रुपये मिळतील.
स्टेट बँक ऑफ इंडिया
स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ज्येष्ठ नागरिकांना तीन वर्षांच्या FD वर 7.25 टक्के व्याजदर देत आहे. येथे आता गुंतवलेली 1 लाख रुपयांची रक्कम तीन वर्षांत वाढून 1.24 लाख रुपये होईल.