Ahmednagar News : घरकुलाचे कामे न करता बिले काढण्यात आली आहेत. रोजगार हमीच्या कामावर जे मजूर दाखवले आहेत ते बाहेरगावी रहायला आहेत. ग्रामपंचायतीचा निधी अखर्चीत आहे. ग्रामपंचायतीच्या मासिक बैठकीला सरपंच व ग्रामसेवकच अनुपस्थीत राहतात.
याची चौकशी करुन कारवाई करण्याची मागणी जिल्हा परीषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांच्याकडे जाटदेवळे गावचे ग्रामपंचायत सदस्य महादेव रहाटे यांनी केली आहे.

रहाटे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, जाटदेवळे ग्रामपंचायतीचा मनमानी कारभार सुरू आहे. ग्रामपंचायतीला आमदार निधी दिलेला आहे त्याची कामे होत नाहीत.
इतर निधी येवुनही त्याचीही कामे होत नाहीत. मासिक बैठक होत नाहीत. सरपंच व ग्रामसेवकच बैठकीला अनुपस्थीत राहतात. केवळ कागदावर सभा झाल्याचे दाखवतात. काही सदस्य बाहेरगावी आहेत.
गावातील काही सदस्य बैठकीला उपस्थीत नसतात. घरकुलाचे पैसे काढले मात्र कामे झालेली नाहीत. ईमस्टरला जे मजुर दाखविले आहेत ते बाहेरगावी रहायला गेलेले आहेत.
विकासाची कामे बंद पडली असल्याबाबत गंभीर आरोप या निवेदनाव्दारे करण्यात आले असून, याबाबत जिल्हा परीषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांनी चौकशी करावी व दोषीविरुद्ध कारवाई करावी, अशी मागणी माजी सरपंच व विद्यमान सदस्य महादेव रहाटे यांनी केली आहे.