Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातील चोऱ्यांचे प्रमाण चिंताजनक आहे. आता चोरटयांनी शेतकऱ्यांच्या मालाला देखील टार्गेट केले आहे. मध्यंतरी तूर, डाळिंब आदी चोरीच्या घटना ताजा असतानाच आता एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शेतातील साडेतीन लाख रुपयांच्यावर टरबुजाची चोरी चोरटयांनी केली आहे.
ही घटना संगमनेर तालुक्यातील साकूर येथे घडली. अलीभाई मोमीन यांच्या शेतामधील माल चोरून नेला आहे. शुक्रवारी मध्यरात्री ही घटना घडली सडून अस्मानी सुलतानी संकटांनी घेरलेल्या शेतकऱ्यांना आता चोरट्यांचेही भय सतावू लागले आहे.
अधिक माहिती अशी : अलीभाई रज्जाक मोमीन यांची साकुर-दरेवाडी रस्त्यालगत शेती आहे. तेथे दीड एकर शेतीत कलिंगड आहे. हा माल विक्रीसाठी आला असताना चोरट्यांनी मोठ्या साईजच्या टरबुजची चोरी केली. जवळपास साडेतीन लाखांचे हे टरबूज असल्याचा अंदाज आहे.
मोमीन यांनी शुक्रवारी सकाळी १३ रुपयांनी व्यापाऱ्याला टरबूज विकले होते. शेतात फेरफटका मारला असता टरबूज फडातून चोरीला गेल्याचे मोमीन यांच्या निदर्शनास आले. दरम्यान आता चोरटयांनी शेतीकडे मोर्चा वळवला असल्याने भीतीचे वातावरण आहे.