शिर्डी लोकसभा मतदारसंघ हा काँग्रेसचा बालेकिल्ला असल्याने तो काँग्रेसच्या वाट्याला यावा

Ahmednagarlive24 office
Published:
Ahmednagar News

Ahmednagar News : शिर्डी लोकसभा व विधानसभा मतदारसंघातील विकास कामाचे श्रेय हे काँग्रेस पक्षाचे आहे. राज्यात सध्या कार्यरत असलेले खोके सरकार सर्वसामान्य जनतेला मान्य नाही. राज्यातील ४८ पैकी ४२ जागावर इंडिया आघाडी ला अनुकूल वातावरण आहे.

त्यामुळे शिर्डी लोकसभा मतदारसंघ हा काँग्रेसचा बालेकिल्ला असल्याने तो काँग्रेसच्या वाट्याला यावा, यासाठी कार्यकर्ता म्हणून आपण प्रयत्न करणार असल्याचे मत काँग्रेस प्रवक्ते व पक्षाचे सर चिटणीस डॉ. राजू वाघमारे यांनी आश्वी येथे पत्रकारशी संवाद साधताना व्यक्त केले.

काँग्रेस प्रवक्ते डॉ. राजू वाघमारे यांनी आश्वी (ता. संगमनेर) येथे नुकतीच भेट दिली. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. याप्रसंगी रिपाईचे (गवई गट) जिल्हाध्यक्ष किशोर वाघमारे, आश्वी बुद्रकचे सरपंच नामदेव शिंदे, बबन शिंदे तसेच परिसरातून भेटीसाठी आलेले काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी डॉ. राजू वाघमारे यांनी भाजपच्या केंद्र व राज्यातील सरकारच्या ध्येय धोरणावर कडाडून टीका करताना शंभर स्मार्ट सिटी, उज्ज्वला गॅस, शौचालय योजना, अशा विविध योजना फेल गेल्याचे सांगून कधी नव्हे ते इतक्या मोठ्या प्रमाणात देशात बेरोजगारीचे प्रमाण वाढल्याचे म्हटले आहे.

तसेच प्रभू श्रीराम यांच्या नावाचा वापर भाजप राजकारणासाठी करत असल्याचा आरोप डॉ. वाघमारे यांनी करत हिंदू धर्मातील सर्वोच्च धर्मगुरू असलेल्या शंकराचार्य यांच्याबाबत प्रश्न उपस्थित करणारे खरे हिंदू आहेत का? अशी टिका त्यांनी यावेळी केली. तसेच नोट बंदी वरुन देखील त्यांनी भाजपचे वाभाडे काढले आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe