Samsung Galaxy S22 Ultra : सॅमसंग ही दक्षिण कोरिया मधील एक दिग्गज टेक कंपनी आहे. या कंपनीचे स्मार्टफोन भारतात खूपच लोकप्रिय आहेत. अनेकांना सॅमसंग कंपनीचे स्मार्टफोन विशेष आवडतात. कंपनीची एस सिरीज तर ग्राहकांना खूपच आवडली आहे. या सिरीजचे जवळपास सर्वच फोन ग्राहकांनी हातोहात घेतले आहेत. दरम्यान सॅमसंग गॅलेक्सी एस 22 अल्ट्रा खरेदी करू इच्छिणाऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर आली आहे.
ती म्हणजे सॅमसंगच्या या दमदार स्मार्टफोनवर आता तब्बल 30,000 पर्यंतची सूट मिळणार आहे. त्यामुळे आता कमी बजेट असलेल्या लोकांना देखील हा फोन खरेदी करता येणे शक्य होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अमेझॉनवर सध्या ग्रेट रिपब्लिक डे सेल सुरू आहे. अमेझॉनवर सुरू असलेल्या या सेलमध्ये सॅमसंगच्या या दमदार मॉडेलवर देखील मोठी सूट मिळतं आहे. हा स्मार्टफोन भारतात एक लाख 9 हजार 999 रुपयांना लॉन्च करण्यात आला होता.
मात्र कंपनीने गेल्या वर्षी या स्मार्टफोनच्या किमतीत कपात केली होती. विशेष म्हणजे आता अमेझॉन वर रिपब्लिक डे सेल सुरू असल्याने या सेलमध्ये देखील या स्मार्टफोनवर अतिरिक्त डिस्काउंट ऑफर करण्यात आले आहेत. त्यामुळे आता आपण अमेझॉनच्या या सेलमध्ये सॅमसंग एस 22 अल्ट्रा किती रुपयांना उपलब्ध आहे हे थोडक्यात पाहणार आहोत.
कितीला मिळतोय Samsung S22 Ultra
मिळालेल्या माहितीनुसार, सॅमसंग गॅलेक्सी एस 22 अल्ट्रा बेस वेरिएंट 12 जीबी रॅम आणि 256 जीबी स्टोरेजचा स्मार्टफोन अमेझॉन वर 84 हजार 999 विक्रीसाठी सूचीबद्ध करण्यात आला आहे. मात्र, याच्या खरेदीवर अमेझॉनवर चार हजार रुपयांचे कुपन डिस्काउंट उपलब्ध आहे. तसेच एसबीआय क्रेडिट कार्डचा वापर करून पेमेंट केले तर एक हजार रुपयांची अतिरिक्त सूट मिळणार आहे. म्हणजेच, हा स्मार्टफोन मूळ लॉन्च किंमत पेक्षा जवळपास तीस हजार रुपयांनी स्वस्तात ग्राहकांना खरेदी करता येणार आहे.
निश्चितचं अमेझॉनच्या रिपब्लिकन डे सेलचा फायदा घेऊन ग्राहकांना हा जबरदस्त फिचर्सचा फोन स्वस्तात खरेदी करता येणार आहे. विशेष म्हणजे, अमेझॉनकडून एक्सचेंज ऑफर देखील पुरवली जात आहे. एक्सचेंज ऑफर अंतर्गत जुना हँडसेट देऊन हा नवीन हँडसेट खरेदी करता येणार आहे. एक्सचेंज ऑफर अंतर्गत 41 हजार 250 रुपयांपर्यंतचा एक्सचेंज डिस्काउंट मिळू शकणार आहे. पण हे सर्वस्वी जुन्या स्मार्टफोनच्या कंडिशनवर आणि मॉडेलवर अवलंबून राहणार आहे.
सॅमसंग गॅलेक्सी एस 22 अल्ट्रा फीचर्स
सॅमसंग कंपनीचा हा दमदार फोन तरुणांमध्ये विशेष लोकप्रिय ठरलेला आहे. या स्मार्टफोनला बाजारात खूपच मागणी आहे. कंपनीच्या या स्मार्टफोन 2K रिझोल्यूशनसह 6.8-इंच डायनॅमिक AMOLED 2X डिस्प्ले आहे. डिस्प्ले 120Hz रिफ्रेश रेट आणि HDR10+ सपोर्ट करतो. विशेष म्हणजे डिस्प्लेला गोरिला ग्लास व्हिक्टस+ संरक्षण देण्यात आलं आहे. फोनच्या मागील पॅनलवर, 108MP मुख्य सेन्सर, 10MP पेरिस्कोप सेन्सर आणि 12MP अल्ट्रावाइड सेन्सरसह कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यात 40MP सेल्फी कॅमेरा आहे.
या फोनची सेल्फी ची कॅमेरा क्वालिटी आणि बॅक कॅमेऱ्याची क्वालिटी खूपच खतरनाक आहे. फोन 12GB रॅम आणि 256GB स्टोरेजसह क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 8 Gen 1 प्रोसेसरने बिल्ड आहे. याचा कॅमेरा 100x झूमसह येतो. म्हणजेच लांब वरचा फोटो देखील झूम करून कॅप्चर करता येणार आहे. यात 45W वायर्ड आणि 15W वायरलेस चार्जिंगसह 5000mAh बॅटरी पॅक देण्यात आले आहे. म्हणजे बॅटरीच्या बाबतीतही फोन चांगला दमदार आहे.