जिओची ग्राहकांसाठी विशेष ऑफर ! आता प्रत्येकाला मिळणार 5 GB….; वाचा संपूर्ण माहिती

Ahmednagarlive24 office
Published:

Jio New Recharge Plan : आपल्यापैकी अनेकजण जिओचे सिम वापरत असतील, कदाचित तुम्हीही त्यातलेच एक असाल. जर तुमच्याकडेही जिओचे सिम कार्ड असेल तर तुमच्यासाठी एक अतिशय महत्त्वाची आणि कामाची बातमी आहे. खरंतर रिलायन्स इंडस्ट्रीजच्या मालकीची रिलायन्स जिओ ही कंपनी आपल्या ग्राहकांसाठी वेगवेगळे रिचार्ज प्लान घेऊन येत असते.

कंपनी या रिचार्ज प्लॅन सोबत ग्राहकांना अनेक लाभ उपलब्ध करून देते. मात्र, वापरकर्त्यांना काही लाभाबाबत फारशी माहिती नसते. फक्त रिचार्ज करून इंटरनेट चालवण्यातच ग्राहक खुश असतात. दरम्यान आज आपण रिलायन्स जिओच्या प्लॅन सोबत प्रत्येकाला मोफत दिल्या जाणाऱ्या 5 जीबी जिओ क्लाऊड बाबत जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

जिओ कंपनी प्रत्येक ग्राहकाला 5 जीबी जिओ क्लाऊड मोफत उपलब्ध करून देत आहे. खरे तर बाजारात ग्राहकांना अतिरिक्त क्लाऊड स्टोरेज साठी पैसा खर्च करावा लागतो. मात्र जिओ आपल्या ग्राहकांना मोफत क्लाऊड स्टोरेज पुरवत आहे. कंपनी 5 जीबी पर्यंतचे जिओ क्लाउड स्टोरेज मोफत देते. दरम्यान आता आपण जिओ क्लाऊड स्टोरेज नेमकं काय आहे याविषयी थोडक्यात जाणून घेणार आहोत.

काय आहे जिओक्लाऊड

Google Drive, OneDrive किंवा Dropbox प्रमाणे, JioCloud ही सुद्धा एक क्लाउड स्टोरेज सेवा आहे. वापरकर्ते त्यांच्या फायली त्याच्या उपलब्ध स्टोरेजमध्ये जतन करू शकतात आणि त्यांच्या एकाधिक डिव्हाइसवर यामध्ये प्रवेश करू शकतात. Jio Cloud सेवेसह, वापरकर्त्यांना 5GB स्टोरेज दिले जाते. JioCloud अॅप एक ऑटो बॅकअप पर्याय ऑफर करतो, म्हणजेच तुम्ही फोनवर फोटो किंवा व्हिडिओंचा बॅकअप आपोआप सेव्ह करू शकता.

कॉन्टॅक्ट लिस्टचा बॅकअप घेणे, अॅप लॉक, अॅडव्हान्स सर्च, ऑफलाइन मोड आणि सुरक्षित शेअर यांसारखी वैशिष्ट्ये देखील त्याचाच एक भाग आहेत. अॅप समर्पित दस्तऐवज स्कॅनरसह देखील येतो. जिओच्या कोणत्याही प्रीपेड प्लॅनमधून रिचार्ज केल्यानंतर, तुम्हाला Google Play Store किंवा App Store वर जाऊन JioCloud अॅप डाउनलोड करावे लागेल. त्यानंतर तुम्ही जिओ नंबर आणि त्यावर पाठवलेल्या ओटीपीच्या मदतीने अॅपमध्ये लॉग इन करू शकता. मग तुम्ही क्लाउड स्टोरेज वापरणे सुरू करू शकता.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe