ICAR-CIRCOT Bharti 2024 : पदवीधर उमेदवारांना मुंबईत नोकरीची संधी; दरमहा इतका मिळेल पगार…

Published on -

ICAR-CIRCOT Bharti 2024 : पदवीधर उमेदवारांसाठी नोकरीची उत्तम संधी आहे. ICAR- केंद्रीय कापूस तंत्रज्ञान संशोधन संस्था अंतर्गत सध्या भरती सुरु असून, यासाठी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. या भरतीसाठी उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे होणार असून, खाली दिलेल्या तारखेला मुलाखतीसाठी हजर राहायचे आहे.

ICAR- केंद्रीय कापूस तंत्रज्ञान संशोधन संस्था अंतर्गत “यंग प्रोफेशनल-I” पदांच्या एकूण 06 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता अर्जासह हजर राहावे. मुलाखतीची तारीख 08 फेब्रुवारी 2024 असून, खाली दिलेल्या पत्त्यावर हजर राहावे.

या भरतीसाठी पदवीधर उमेदवारांनी अर्ज करावेत, तसेच येथे अर्ज करण्यासाठी वयोमर्यादा 21 ते 45 वर्षे इतकी आहे. या भरतीसाठी उमेदवारांनी ICAR-CIRCOT, अडेनवाला रोड, पाच गार्डन्स जवळ, माटुंगा, मुंबई 400 019 या पत्त्यावर हजर राहायचे. मुलाखतीची तारीख 08 फेब्रुवारी 2024 आहे.

भरती संबंधित अधिक माहिती हवी असेल तर अधिकृत वेबसाईट https://circot.icar.gov.in/ ला भेट द्या. या भरती अंतर्गत निवड झालेल्या उमेदवाराला दरमहा 30.000/- इतका पगार मिळेल.

निवड प्रक्रिया

-या भरतीकरिता उमेदवारांची निवडमुलाखती द्वारे होणार आहे.
-मुलाखतीसाठी वर दिलेल्या पत्त्यावर हजर राहायचे आहे.
-मुलाखतीस येताना सोबत आवश्यक कागदपत्रे आणावीत.
-मुलाखतीची तारीख 08 फेब्रुवारी 2024 आहे.
-उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी भरती जाहिरात सविस्तर वाचा.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!