MPKV Rahuri Bharti 2024 : पदवीधर उमेदवारांना महात्मा फुले कृषी विद्यापीठ अहमदनगर अंतर्गत नोकरीची संधी, येथे पाठवा अर्ज…

Ahmednagarlive24 office
Published:
MPKV Rahuri Bharti 2024

MPKV Rahuri Bharti 2024 : अहमदनगर महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी अंतर्गत सध्या विविध पदांवर भरती सुरु असून, यासाठी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. तुम्ही एका चांगल्या नोकरीच्या शोधात असाल तर ही संधी तुमच्यासाठी चांगली आणि उत्तम आहे. या भरतीसाठी उमेदवारांकडून अर्ज ऑफलाईन पद्धतीने मागवले जात आहेत. इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या पत्त्यावर आपले अर्ज पाठवू शकतात.

महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी अंतर्गत “संशोधन सहयोगी, डेटा एंट्री ऑपरेटर” पदांच्या एकूण 02 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने सादर करण्याची शेवटची तारीख 22 जानेवारी 2024 असून, उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज खाली दिलेल्या पत्त्यावर पाठवावेत.

संशोधन सहयोगी पदासाठी अर्जदाराकडे पीएच.डी. कीटकशास्त्र / वनस्पती पॅथॉलॉजी किंवा समकक्ष पदवी असावी, तसेच डेटा एंट्री ऑपरेटर पदासाठी उमेदवार पदवीधर असणे गरजेचे आहे. या भरती साठी वयोमर्यादा पुरुषांसाठी 40 वर्षे तसेच महिलांसाठी 45 वर्षे इतकी आहे.

तरी इच्छुक उमेदवार प्रिन्सिपल इन्व्हेस्टिगेटर, सेंटर ऑफ एक्सलन्स फॉर डिजिटल टेक्नॉलॉजीज स्मार्ट आणि प्रिसिजन ऍग्रीकल्चरसाठी (CoE-DTSPA), कृषी विभाग. अभियांत्रिकी, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी, जि. अहमदनगर-413722 या पत्त्यावर आपले अर्ज पोस्टाने 22 जानेवारी 2024 पर्यंत सादर करू शकतात. या भरती संबंधित तुम्हाला आणखी माहिती हवी असल्यास अधिकृत वेबसाईट https://mpkv.ac.in/ ला भेट द्या.

अशा पद्धतीने करा अर्ज

-या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने सादर करायचा आहे.
-अर्ज वर दिलेल्या पत्त्यावर पाठवायचे आहेत.
-अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
-अर्जासोबत आवश्यक कागदपत्रात्रे जोडावीत.
-उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी भरती जाहिरात सविस्तर वाचा.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe