Bigg Boss 17 : बिग बॉस 17 चा फिनाले 28 जानेवारी रोजी होणार आहे. बिग बॉसच्या घरात राहिलेले सर्व स्पर्धक फिनालेमध्ये आपले स्थान निर्माण करण्यासाठी प्रत्येक टास्कमध्ये सर्वतोपरी प्रयत्न करताना दिसत आहेत. अशातच आज आपण या सीझनमध्ये जिंकणाऱ्या स्पर्धकाला किती पैसे मिळणार आहेत तसेच त्यासोबत त्याला काय-काय मिळणार आहे पाहूया…
सध्या 8 स्पर्धक फिनालेसाठी लढत आहेत. ज्यामध्ये अंकिता लोखंडे, विकी जैन, मुनावर फारुकी, आयशा खान, ईशा मालवीय, मनारा चोप्रा, अभिषेक कुमार आणि अरुण महाशेट्टी आहेत.
बिग बॉस सीझन 17 च्या विजेत्याला ट्रॉफीसह मोठी रक्कम मिळणार आहे. Siasat.com च्या रिपोर्टनुसार, या सीझनच्या विजेत्याला 30-40 लाख रुपये मिळणार आहेत. गेल्या वर्षीच्या विजेत्या रॅपर एमसी स्टॅनला ३१.८ लाख रुपये मिळाले होते.
बिग बॉसच्या विजेत्याला या सीझनमध्ये ट्रॉफी आणि पैशांसोबत एक आलिशान कारही मिळणार आहे. विजेत्याला Hyundai ची Creta SUV मिळणार आहे. नुकत्याच झालेल्या एका एपिसोडमध्ये याची घोषणा करण्यात आली. Creta चे नवीन मॉडेल 16 जानेवारी रोजी भारतीय बाजारात लॉन्च करण्यात आले आहे. बिग बॉसच्या विजेत्यालाच हे नवीन मॉडेल मिळणार आहे.
सध्या शोमध्ये स्पर्धक त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे खूप चर्चेत आले आहेत. अंकिता आणि विकी संपूर्ण सीझनमध्ये भांडताना दिसले. त्यांना पाहून चाहते हे दोघे शोमधून बाहेर आल्यानंतर घटस्फोट घेऊ शकतात, असा अंदाज बांधत आहेत. दुसरीकडे, ईशा मालवीय तिचा एक्स बॉयफ्रेंड अभिषेकसोबत शोमध्ये दाखल झाली होती. काही वेळाने तिचा सध्याचा प्रियकर समर्थ जुरेल देखील आला होता. शोमध्ये तिघेही आपापसात भांडताना दिसले. सुरुवातीला मुनावरची प्रतिमा चांगली होती, आता आयशाच्या आगमनानंतर आणि अनेक खलाशांनंतर त्यांची प्रतिमा खूपच खराब झाल्याचे दिसून आले. आयशाच्या या खुलाशानंतर मुनव्वरला सोशल मीडियावर खूप ट्रोल करण्यात आले. अशातच आता या स्पर्धकांमध्ये कोण ट्रॉफी घेऊन जाणार हे पाहणे महत्वाचे ठरेल.