वेदमंत्रांच्या जयघोषात कोरठण खंडोबाला लागली हळद

Ahmednagarlive24 office
Published:
Ahmednagar News

प्रतिजेजुरी म्हणून नावलौकिक असलेल्या पारनेर तालुक्यातील पिंपळगाव रोठा श्रीक्षेत्र कोरठण खंडोबाला पौष नवरात्री प्रारंभानिमित्त मंगळवारी पारंपरिक व वेदमंत्रांच्या जयघोषत देवाला हळद लागली. पौष पौर्णिमेला खंडोबाचे म्हाळसाबरोबर लग्न झाले, त्यानिमित्त मंगळवारी सकाळी हा कार्यक्रम संपन्न झाला.

पिंपळगाव रोठा श्रीक्षेत्र खंडोबा देवस्थान कोरठण (प्रति जेजुरी) येथे यात्रेनिमित्त देवाला हळद लावण्याचा कार्यक्रम जि. प. सदस्या सौ. राणीताई निलेश लंके यांच्या हस्ते पार पडला. या वेळी कोरठण खंडोबा देवस्थानच्या अध्यक्षा सौ. शालिनीताई घुले, सरपंच सुरेखा वाळुंज, सौ. सुवर्णाताई धाडगे, सौ. सुरेखा पवार, सौ. सुरेखा चेडे, सौ. वैजंता मते, सौ. दिपाली औटी आदी महिला उपस्थित होत्या.

पिंपळगाव रोठा गावात प्रथम ग्रामस्थ व महिलांनी वाजत गाजत मिरवणूक काढली, हळकुंड व पूजेचे सामान घेऊन महिला गावातून वाजत गाजत आल्या मंदिरात जात्यावर हळद दळून देवाचा महिमा व ओव्या अत्यंत सुमधुर आवाजात म्हणाल्या.

श्रीक्षेत्र कोरठण खंडोबा देवस्थानच्या स्वयंभू श्री खंडोबा देवाला जिल्हा नियोजन समितीच्या सदस्या व माजी. जि.प सदस्या राणीताई नीलेश लंके यांच्यासह परिसरातील शेकडो महिलांनी पारंपरिक रित्या व वेदमंत्रांच्या जयघोषत हळद लावली आणि देवाचे नवरात्र सुरू झाले.

श्री खंडोबाला परंपरेप्रमाणे हळद लावण्यात आली. या वेळी महिलांची मोठी गर्दी झाली होती. मंगळवारी पिंपळगाव रोठा गावातून शेकडो महिलांनी हळद घेऊन मांडव डहाळयासह मोठी मिरवणूक काढली. ही मिरवणूक कोरठण देवस्थानजवळ आल्यानंतर देवस्थानच्या वतीने स्वागत करण्यात आले.

तर कोरठण गड परिसरातील विविध धार्मिक कार्यक्रमाप्रसंगी अध्यक्षा शालिनीताई घुले, ज्येष्ठ विश्वस्त पांडुरंग गायकवाड, उपाध्यक्ष महेश शिरोळे, खजिनदार तुकाराम जगताप, सचिव जालिंदर खोसे, सहसचिव कमलेश घुले, विश्वस्त राजेंद्र चौधरी, माजी सरपंच अशोक घुले, अजित महांडुळे, रामदास मुळे, धोंडीभाऊ जगताप, दिलीप घुले, महादेव पुंडे, चंद्रकांत ठुबे यांच्यासह मोठ्या संख्येने भाविक व ग्रामस्थ उपस्थित होते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe