माजी आ. कर्डिले यांच्या प्रयत्नातून ६ कोटींचा निधी मंजूर

Ahmednagarlive24 office
Published:
Ahmednagar News

Ahmednagar News : तालुक्यात मृद व जलसंधारण योजनेअंतर्गत पाच कोटी तर अल्पसंख्यांक विकासासाठी एक कोटी रुपयांचा निधी माजी आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या प्रयत्नातून मंजूर झाला असल्याची माहिती बाजार समितीचे संचालक मधुकर मगर यांनी दिली.

नगर तालुका दुष्काळी पट्टा म्हणून ओळखला जातो. तालुक्यातील नागरिकांचा शेती हा मुख्य व्यवसाय असून जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसाय ही मोठ्या प्रमाणात करण्यात येतो.

शेतकऱ्यांच्या पाण्याची समस्या मिटवण्यासाठी माजी आ. शिवाजीराव कर्डिले यांच्या प्रयत्नातून जलसंधारण अंतर्गत पाच कोटी सात लाख रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. पिंपळगाव माळवी तसेच पिंपळगाव लांडगा येथे जलसंधारण अंतर्गत कोल्हापुरी पद्धतीचे बंधारे या निधीतून होणार आहेत.

पिंपळगाव माळवी येथील रायकर मळा, सांडीचा मळा, बनकर वस्ती येथे तर पिंपळगाव लांडगा येथील महादेव वस्ती, लांडगे मळा येथे असे एकूण पाच बंधाऱ्यांचे काम होणार आहे. बंधाऱ्यांचे काम पूर्ण झाल्यानंतर परिसरातील नागरिकांना त्याचा मोठा फायदा होणार असल्याचेही मधुकर मगर यांनी सांगितले.

अल्पसंख्यांक विकास योजनेअंतर्गत नागरदेवळे, खोसपुरी, जेऊर, पिंपळगाव माळवी, पिंपळगाव उज्जैनी, कापूरवाडी, दहिगाव, वाळकी, माथणी, वाळुंज या गावांनी विविध विकास कामे होणार आहेत. त्यासाठी एक कोटी रुपयांचा निधी मंजूर आहे.

सदर कामांना प्रशासकीय मान्यता मिळाली असून लवकरच कामे मार्गी लागणार आहेत. माजी आ. कर्डिले यांच्या प्रयत्नांतून विकासाची गंगा वाहत आहे. कर्डिले हे नेहमीच ग्रामीण भागातील नागरिकांच्या विकासाची नाळ ओळखून कामांना प्राधान्य देत आहेत. तालुक्यात सहा कोटी रुपयांचा निधी मंजूर केल्याबद्दल कर्डिले यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe