खा.सुजय विखेंनी स्पष्टच सांगितलं ! प्रभू श्रीराम हे कुठल्याही पक्षाचे नसून..

Published on -

Ahmednagar News : आयोध्या येथे प्रभू श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठेचा कार्यक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दि. २२ जानेवारी या सुवर्ण दिवशी होणार असून, हा कार्यक्रम सर्व भारतीयांचा आहे. प्रभू श्रीराम हे कुठल्याही पक्षाचे नसून संपूर्ण भारत देशाचे आहेत, असे प्रतिपादन खा. डॉ. सुजय विखे पाटील यांनी केले.

येथील श्री जगदंबा देवी भक्तनिवास येथे विविध विकास कामांचा लोकार्पण सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. तयार केलेले लाडू जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना वाटा, राशीनच्या जनतेने कार्यक्रमास चांगला प्रतिसाद दिला असून, सेच प्रेम व आर्शिवाद माझ्या पाठिशी ठेवा, असे ते म्हणालो.

या वेळी राजेंद्र देशमुख म्हणाले, श्रीराम प्राण प्रतिष्ठेनिमित्त मतदारसंघात प्रसादासाठी डाळ व साखर वाटप करणारे खा. विखे हे देशातील एकमेव खासदार आहेत. येणाऱ्या काळात रराशीनमधील जनता त्यांच्या मागे राहील.

या वेळी शहाजीराजे राजेभोसले, सरपंच निलम भिमराव साळवे, जिल्हा बँकेचे संचालक अंबादास पिसाळ यांची भाषणे झाली. कार्यक्रमास सरपंच निलम भीमराव साळवे, शहाजीराजे राजेभोसले, भाजपाचे तालुका उपाध्यक्ष सुनिल काळे, विक्रमराजे राजेभोसले, सुनिल यादव,

अशोक खेडकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती काकासाहेब तापकिर, दादा सोनमाळी, बापू धोंडे, पाडुरंग भंडारे, योगेश शर्मा, धनंजय मोरे, महिला आघाडीच्या तालुकाध्यक्ष अॅड. प्रतिभा रेणूकर, यांच्यासह कार्यकर्ते, ग्रामस्थ उपस्थित होते. सूत्रसंचालन मालोजीराजे भिताडे व दिपक थोरात यांनी केले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe