SBI Alert : SBIकडून ग्राहकांसाठी अलर्ट जारी, चुकूनही करू नका ‘हे’ काम, अन्यथा…

Published on -

SBI Alert : तुम्ही देखील SBI बँकेचे ग्राहक असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची असेल, बँकेने ग्राहकांसाठी एक अलर्ट जारी केला आहे. बँकेने खातेधारकांना एका मेसेज संदर्भात अलर्ट केले आहे. बँकेने म्हटले आहे की, ग्राहकांना त्यांची खाती बंद करण्याचे संदेश मिळत आहेत. अशा मेसेज पासून ग्राहकांनी सावध राहावे. 

एसबीआयने आपल्या ग्राहकांना अशा कोणत्याही फसव्या संदेशांना उत्तर देऊ नये असे सांगितले आहे. तसेच त्यांना तुमची कोणतीही वैयक्तिक माहिती, OTP किंवा खात्याशी संबंधित माहिती देऊ नका. जर तुम्ही अशा संदेशांना उत्तर दिले तर तुम्ही अडचणीत येऊ शकता. हे मेसेज फसवणूक करणाऱ्यांकडून पाठवले जात आहेत. असे बँकेकडून सांगण्यात आले आहे.

मेसेजमध्ये काय लिहिले आहे?

बँकेच्या नावाने फसवणूक करणाऱ्यांकडून पाठवण्यात येत असलेल्या मेसेजमध्ये ‘प्रिय खातेधारक, तुमचे खाते ब्लॉक केले जाईल, असे लिहिले आहे. पॅन कार्ड अपडेट करण्यासाठी दिलेल्या लिंकवर क्लिक करा. तुम्हाला असे मेल देखील मिळू शकतात. ज्याला उत्तर देण्याची गरज नाही. ही फसवणूक करण्याची पद्धत आहे. त्यामुळे अनेकांची लाखोंची फसवणूक झाली आहे.

असा मेसेज आल्यास काय करावे ?

जर तुम्हालाही असे मेसेज येत असतील तर तुम्ही [email protected] वर जाऊन तक्रार करू शकता, यासोबतच सायबर क्राईम हेल्पलाइन नंबर 1930 वरही तक्रार करता येईल. सायबर क्राइम ब्रँचच्या अधिकृत वेबसाइट https://cybercrime.gov.in/ वरही तक्रार करता येते.

फसवणूक झाल्यास काय करावे?

अशी फसवणूक तुमच्यासोबत कधी झाली तर सर्वप्रथम तक्रार करा. जेणेकरून तुमचे संपूर्ण पैसे परत मिळतील. आरबीआयच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, प्रथम तुमच्या बँकेला याबद्दल माहिती द्या. त्यानंतर तुम्ही फसवणूक टाळू शकता. कारण बँका सायबर फ्रॉडसाठी विमा पॉलिसी घेतात. तुम्ही माहिती देता तेव्हा बँक ती माहिती विमा कंपनीला पाठवेल. जेणेकरून तुमचे संपूर्ण पैसे परत मिळू शकतील.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe