Ram Mandir : अयोध्यामध्ये आज प्रभू श्री रमाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली आहे. या अद्भुत सोहळ्यासाठी VIP उपस्थित आहेत. यड्यापासून रॅम भक्तांना दर्शनासाठी राम मंदिर खुले केले जाणार आहे. राम मंदिरामध्ये मोठी रामाची मूर्ती बसवण्यात आली आहे.
भगवान श्री रामाच्या मूर्तीचे वजन दोनशे किलो आहे. तसेच मूर्तीचा रंग देखील काळा ठेवण्यात आला आहे. ही मूर्ती श्रीरामाच्या बालस्वरूपात बनवण्यात आली असून ती गडद रंगाची आहे. मात्र मूर्तीचा रंग काळाचा का ठेवण्यात आला हे जाणून घेऊया…
फक्त काळा रंग का?
महर्षि वाल्मिकींच्या रामायणात भगवान श्रीरामाच्या गडद रूपाचे वर्णन करण्यात आले आहे. म्हणून राम मंदिरात बनवण्यात आलेल्या मूर्तीचा रंग देखील काळा ठेवण्यात आला आहे. श्री रामाची मूर्ती बनवण्यात आलेला दगड हा खूप खास मानला जात आहे.
श्याम शिला म्हणून असे दगडाला ओळखले जाते. दगडाचे वय हजारो वर्षे आहे. या दगडाच्या मूर्तीत हजारो वर्षे कोणताही बदल होणार नाही त्यामुळे रामाच्या मूर्तीसाठी हा दगड निवडण्यात आला आहे. हिंदू धर्मात, पूजेच्या वेळी अभिषेक केला जातो. पाणी, चंदन आणि दूध या पदार्थाने मूर्तीला कोणतीही इजा होणार नाही.
मुलाच्या रूपात मूर्ती का बनवली गेली?
प्रभू श्री रामाची मूर्ती बाल स्वरूपात बनवण्यात आली आहे. मान्यतेनुसार, जन्मस्थानात बाल स्वरूपाची पूजा केली जाते. मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यापूर्वी तो एक दगड असतो. त्यामुळे प्राणप्रतिष्ठा करून त्यामध्ये प्राण घालावे लागते. त्याशिवाय मूर्तीपूजा पूर्ण मानली जात नाही. मूर्तीची पूजा करून त्याचा अभिषेक केला जातो.