ठेका मिळवून देतो सांगून दीड कोटीची फसवणूक

Ahmednagarlive24 office
Published:
Ahmednagar News

Ahmednagar News : ठेका मिळवून देतो, असे सांगून तब्बल दीड कोटीची फसवणूक केल्याप्रकरणी भाजयुमोच्या माजी पदाधिकाऱ्यावर कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी कॉन्ट्रॅक्ट मिळवून देण्याचे आमिष दाखवून आरोपी भरत उदयसिंग परदेशी (रा. मालेगाव) याने बनावट कागदपत्रे बनवून व माझे खूप मोठ मोठ्या लोकांशी संबंध आहेत,

असे भासवून तुम्हाला शासनाच्या नवीन कामाचे कॉन्ट्रॅक्ट मिळवून देतो व तुम्हाला त्या नवीन कामाचे वर्क ऑर्डर पाहिजे असतील तर पैसे द्यावे लागतील, असे सांगून १ कोटी ४० लाखाची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी भावेश थोरात (वय ३४, कर्मवीरनगर, कोपरगाव, ता. कोपरगाव)

यांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. हा गुन्हा ऑगस्ट २०१८ ते मार्च २०२३ या कालावधीत घडला असून गुन्हा दिनांक १६ जानेवारी २०२३ रोजी नोदविला गेला आहे.

आरोपी ठरलेल्या कामाची लवकरच वर्क ऑर्डर देतो, असे सांगून टाळाटाळ करत होता. ही बाब फिर्यादी थोरात यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी दिलेल्या पैशांची मागणी केली. तेव्हा तुमचे पैसे मी बुडवणार नाही, असे सांगत आठ दिवसांत तुमचे पैसे व वर्क ऑर्डर देतो, असे सांगितले;

परंतु त्यानंतर आरोपीने थोरात यांचे फोन उचलणे बंद केले व भेटण्यास टाळाटाळ करण्यास सुरुवात केली. ही बाब फिर्यादीच्या लक्षात आल्यावर फिर्यादीस आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर थोरात यांनी न्यायालयात धाव घेतली असता

या प्रकरणी कलम १५६ (३) नुसार न्यायालयाच्या आदेशाने याबाबत शहर पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पुढील सखोल तपास शहर पोलीस करत आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe