राहाता शहर रामभक्तीने फुलले : मंत्री विखेंनी घेतला मिरवणुकीचा आनंद

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ahmednagar News : आयोध्या नगरीत श्रीराम लल्ला यांच्या मूर्तीची हजारो साधू संतांच्या व लाखो राम भक्तांच्या उपस्थितीत प्राण प्रतिष्ठापना होत असताना राहाता शहरातील रस्ते, इमारती, दुकाने व मंदिरे भगवे ध्वज, पताका व विद्युत रोषणाईने झळकले होते.

मंदिरामध्ये भजन-कीर्तन व राम नामाचा गजर होत होता. भोजन व प्रसादाचा ठिकठिकाणी आनंद घेणारे रामभक्त जय श्रीरामच्या जयघोष करीत रामभक्तांना मनसोक्त आनंद लुटत होते. विविध संघटनांच्या वतीने आयोजित मिरवणुकीमध्ये महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनीही सहभाग घेऊन राम भक्तीचा आनंद लुटला.

राहाता शहरात नगरपरिषदेने उत्सवानिमित्त शहरातील सर्व रस्त्यांवर टँकरने पाण्याचा सडा टाकून वातावरण प्रफुल्लीत केले. नगर मनमाड रोडवर विद्युत रोषणाई करून राहता शहर प्रकाशमय केले. पालिकेचे मुख्याधिकारी तुषार आहेर स्वतः जातीने लक्ष ठेवून शहराची स्वच्छता व रोषणाईसाठी पुढाकार घेत होते.

साई योगाचे बापूसाहेब पानगव्हाणे, प्रांताधिकारी माणिक आहेर, तहसीलदार अमोल मोरे यांनी शहरात चार-पाच दिवसांपासून स्वच्छता अभियान राबवून शहर स्वच्छ केले. वीरभद्र देवालयाचे अध्यक्ष साहेबराव निधाने व ग्रामस्थ यांनी वीरभद्र मंदिरासमोर भव्य मंडप उभारून भजन कीर्तनाचे आयोजन करून महाप्रसादाचे वाटप केले.

मंत्र विखे पाटील यांच्या हस्ते रात्री दिवे लावून वीरभद्र मंदिर परिसर प्रकाशमय केला. शहरातील श्रीराम मंदिरामध्ये सुंदर अशी विद्युत रोषणाई व सजावट करण्यात आली. मंदिरामध्ये सकाळी सात वाजताच्या सुमारास महाअभिषेक, दुपारी १२ वाजता श्रीराम रक्षा व हनुमान स्तोत्र पठण व महाआरतीचे आयोजन करून राम भक्तांना राम भक्तीचा आनंद दिला.

यावेळी शिवसेनेचे शिर्डी मतदारसंघाचे खासदार सदाशिव लोखंडे यांच्या वतीने ५१ किलो लाडू प्रसादाचे वाटप करण्यात आले. श्री दत्त साई मंडळाचे अध्यक्ष अॅड. दीपक गांधी व सर्व सदस्य तसेच शिवसेनेचे राहाता तालुकाध्यक्ष सागर बोठे,

विजय काळे यांनी प्रसाद वाटपासाठी योगदान दिले. शहरातील सुनील कुलथे या सराफ व्यवसायकांनी श्री साईबाबांच्या मूर्तीला ४०० ग्रॅम वजनाचा चांदीचा सुंदर मुकुट दिला.

बजरंग दल, राष्ट्रीय स्वयंसेवक सेवक संघ, जैन युवक मंडळ, विश्व हिंदू परिषद व इतर संघटनांसह ग्रामस्थ यांच्या वतीने राहाता शहरातून मिरवणूकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शहरातून मिरवणूक काढण्यात आली.

त्यात मंत्री विखे यांचे आगमन झाले. यावेळी महिलांनी त्यांना औक्षण केले. या मिरवणुकीत माजी नगराध्यक्ष कैलासबापू सदाफळ, डॉ. के. वाय. गाडेकर, डॉ. स्वाधीन गाडेकर, वीरभद्र मंदिराचे अध्यक्ष साहेबराव निधाने, सागर सदाफळ आदींनी सहभाग घेतला.