Personal Loan Interest Rates : जर तुम्ही सध्या बँकेकडून कर्ज घेण्याचा विचार करत असाल तर आजची ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे, आज आम्ही देशातील मोठ्या बँकांचे व्याजदर सांगणार आहोत, तसेच या बँकाकडून कोणत्या ऑफर्स लागू केल्या जात आहेत, हे देखील सांगणार आहोत.
अचानक पैशांची गरज भासल्यास बरेच लोक वैयक्तिक कर्जाचा वापर करतात. अशातच तुमचाही कर्ज घेण्याचा विचार असेल तर तुम्हाला बँकांचे व्याजदर आणि प्रक्रिया शुल्काची माहिती असणे फार गरजेचे आहे.
बँका सहसा वैयक्तिक कर्जावर जास्त व्याज आकारतात. व्याजदर कधीकधी तुमचा क्रेडिट स्कोअर, बँकेशी असलेले संबंध आणि तुम्ही कुठे काम करता यावर अवलंबून असतो.
-देशातील दुसरी सर्वात मोठी खाजगी बँक ICICI बँक वैयक्तिक कर्जावर 10.65 टक्के ते 16 टक्के वार्षिक व्याज आकारते. प्रक्रिया शुल्क म्हणून बँक 2.50 टक्के अधिक कर आकारते.
-HDFC बँक ही देशातील सर्वात मोठी खाजगी बँक आहे. वैयक्तिक कर्जावर बँकेकडून 10.5 ते 24 टक्के व्याज आकारले जाते. परंतु बँकेकडून 4,999 रुपये निश्चित प्रक्रिया शुल्क आकारले जाते.
-स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) कॉर्पोरेट अर्जदारांकडून 12.30 ते 14.30 टक्के व्याज आकारते. सरकारी विभागातील कर्मचाऱ्यांना 11.30 ते 13.80 टक्के दराने व्याज आकारले जाते. संरक्षण क्षेत्रातील कर्मचार्यांसाठी, ते वार्षिक 11.15 ते 12.65 टक्के आहे.
-बँक ऑफ बडोदा सरकारी कर्मचाऱ्यांना 12.40 ते 16.75 टक्के वार्षिक दराने कर्ज देते. याशिवाय खाजगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना 15.15 ते 18.75 टक्के वार्षिक व्याजदराने कर्ज मिळते.
-पीएनबी क्रेडिट स्कोअरवर अवलंबून कर्जदारांना दरवर्षी 13.75 ते 17.25 टक्के दराने कर्ज देते. सरकारी कर्मचार्यांना 12.75 टक्के ते 15.25 टक्के व्याजदर दिला जातो.
-कोटक महिंद्रा बँक वैयक्तिक कर्जावर दरवर्षी किमान10.99 टक्के व्याज आकारते. तथापि, कर्जाच्या फीवर प्रक्रिया शुल्क आणि कर जोडल्यानंतर ते सुमारे 3 टक्क्यांपर्यंत जाते.