OnePlus 12 : 23 जानेवारी 2024 रोजी भारतासह जागतिक बाजारपेठेत OnePlus 12 स्मार्टफोन लॉन्च करण्यात आला. लॉन्च सोबतच या मोबाईल फोनवर आकर्षक ऑफर देखील देण्यात आल्या आहेत. आज आपण या स्मार्टफोनची किंमत आणि यावर मिळणाऱ्या ऑफर बद्दल सविस्तर जाणून घेणार आहोत चला तर मग…
OnePlus 12 ची किंमत

भारतीय बाजारात OnePlus 12 ची सुरुवातीची किंमत 64,999 रुपये ठेवण्यात आली आहे, जी त्याच्या 12GB रॅम आणि 256GB व्हेरिएंटची किंमत आहे. दुसऱ्या 16GB रॅम आणि 512GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 69,999 रुपये ठेवण्यात आली आहे. भारतात 30 जानेवारीपासून या फोनची विक्री सुरु होईल, यापूर्वी आपण त्यावर मिळणाऱ्या ऑफर्सबद्दलही जाणून घेऊया…
OnePlus 12 ऑफर्स
भारतात OnePlus 12 आणि OnePlus 12R वर काही खास डील्स देखील आहेत. स्मार्टफोनसोबत एक्सचेंज बोनस, बँक डिस्काउंट आणि नो-कॉस्ट ईएमआय पर्याय उपलब्ध असतील. तसेच, तुम्हाला पहिल्या 1000 ऑर्डरवर भेटवस्तू, विमा योजनेवर 50% पर्यंत सूट आणि OnePlus पॅडवर 3,000 रुपयांपर्यंत सूट मिळेल.
OnePlus 12 चे स्पेसिफिकेशन्स
OnePlus 12 मध्ये 6.82-इंचाचा OLED LTPO डिस्प्ले आहे, ज्यामध्ये 2K रिझोल्यूशन आणि 120Hz रीफ्रेश रेट आहे. हा स्मार्टफोन Snapdragon 8 Gen 3 प्रोसेसरवर काम करतो. यात LPDDR5X RAM आणि UFS 4.0 स्टोरेज आहे.
या स्मार्टफोनमध्ये 5000mAh बॅटरी आहे जी 100W वायर्ड आणि 50W वायरलेस चार्जिंगला सपोर्ट करते. कॅमेरा सेटअपबद्दल बोलायचे झाले तर, या फोनमध्ये 50-मेगापिक्सलचा प्राइमरी कॅमेरा, 48-मेगापिक्सलचा सेकंडरी कॅमेरा आणि मागील बाजूस 64-मेगापिक्सलचा पेरिस्कोप कॅमेरा आहे. समोर 32-मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. हा स्मार्टफोन Android 14 वर आधारित OxygenOS 14 वर काम करतो. कंपनीने वर्षभरासाठी अँड्रॉइड अपडेटचे आश्वासन दिले आहे.