अभिमानास्पद ! आता भारतीयांच्या हातात दिसणार मेक इन इंडियाचा iPhone, Tata च्या योजनेला सरकारचा हिरवा झेंडा

Ahmednagarlive24 office
Published:

Tata Iphone : भारतातील आयफोन प्रेमींसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. ती म्हणजे आता लवकरच मेक इन इंडिया आयफोन भारतीयांच्या हातात झळकणार आहेत. या संदर्भात नुकताच एक महत्त्वाचा करार झाला आहे. यामुळे आता भारतातच टाटा कंपनीकडून आयफोन निर्मिती होणार आहे.

खरे तर टाटा आणि विस्ट्रॉन या कंपनीच्या मध्यात गेल्यावर्षी एक महत्त्वाचा करार केला. विस्ट्रॉन या तैवानी कंपनीचे भारतातील आयफोन निर्मितीचे प्लांट खरेदी करण्यासाठी टाटाने ऑक्टोबर 2023 मध्ये महत्त्वाचा करार केला होता. विस्ट्रॉनच्या बेंगळुरूजवळील प्लांटमध्ये अ‍ॅपल आयफोनची निर्मिती केली जाते.

आता याच कंपनीच्या भारतातील प्लांट खरेदी करण्यासाठी टाटा कंपनीने गेल्यावर्षी अर्थातच 2023 मध्ये करार केला आहे. म्हणजे टाटा कंपनीने हा प्लांट खरेदी केला आहे. दरम्यान याच डीलसंदर्भात आता एक अतिशय महत्त्वाचे आणि मोठे अपडेट समोर आले आहे. ती म्हणजे या कराराला भारतीय स्पर्धा आयोगाने हिरवा कंदील दाखवला आहे.

सरकारकडून या कराराला हिरवा कंदील मिळाला असल्याने आता लवकरच टाटा कंपनीचे आयफोन आपल्या हातात दिसतील अशी आशा आहे. टाटा आणि विस्ट्रॉन या कंपनीत या करारासाठी जवळपास एक वर्ष सतत चर्चा सुरू होती. या चर्चेअंती अखेरकार हा करार सक्सेस झाला आहे. यामुळे आता टाटा कंपनीचे आयफोन म्हणजेच मेक इन इंडिया आयफोन आपल्या भारतीयांच्या हातात दिसणार आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, विस्ट्रॉनचा हा प्लांट आयफोन 14 मॉडेलच्या निर्मितीसाठी खास ओळखला जात आहे. सध्या या प्लांटमध्ये जवळपास 10 हजारापेक्षा जास्तीचे कामगार काम करत आहेत. विस्ट्रॉनचा हा भारतीय प्लांट त्याच्या 8 उत्पादन लाइनमध्ये आयफोन तयार करत आहे.

आता मात्र हा प्लांट टाटा कंपनी अधिग्रहित करणार आहे. यामुळे विस्ट्रॉन ही तैवानी कंपनी भारताबाहेर पडणार आहे कारण की कंपनीचा हा एकमेव प्लांट आहे. ही कंपनी 2017 पासून एप्पलसाठी आयफोन तयार करत आहे. आता मात्र एप्पलसाठी आयफोन तयार करण्याचे काम टाटाकडून केले जाणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe