Ahmednagar News : अबब ! अहमदनगरमध्ये ६८ टोळ्या,६७० प्रोफेशनल गुन्हेगार तर ६३९ हिस्ट्रीशिटर

Published on -

अहमदनगर जिल्ह्यात गुन्हेगारी चांगलीच फोपावत चालली आहे. रेकॉर्डवर जर एक नजर टाकली तर लक्षात येते की, नगर जिल्ह्यात ६३९ हिस्ट्रीशिटर आहेत. ६८ टोळ्या, ६७० प्रोफेशनल गुन्हेगार अहमदनगर जिल्ह्यामध्ये आहेत. वारंवार गुन्हे करणे, गंभीर गुन्ह्यांमध्ये सहभागी असणे आदींबाबतचे ६३९ गुन्हेगारांचे ‘हिस्ट्रीशिट’ तयार केले आहे. गंभीर गुन्हे करणारे ६८ टोळ्या, कट रचून सराईतपणे गुन्हे करणारे ६७० प्रोफेशनल गुन्हेगार अहमदनगर जिल्ह्यामध्ये आहेत.

काय आहे हिस्ट्रीशीट? ती कशी तयार होते ?

कोणताही गुन्हा केला की त्या गुन्हेगाराचे रेकॉर्ड तयार होते. त्यामध्ये वारंवार गुन्हे करणारे, परिसरात दहशत निर्माण करणारे, सभा, मोर्चे आदी ठिकाणी प्रक्षोभक भाषणे करून कायदा व सुव्यवस्था बिघडविणारे आदींवर पोलीस वाचक ठेवण्यासाठी लक्ष ठेवून असतात. नेहमीच गुन्हेगारी कारवाया करणारे गुन्हेगार आहेत त्यांची माहिती पोलिस दरवर्षी गोळा करत असतात.

पोलिस अधीक्षक यांच्या अध्यक्षतेखाली क्राईम कॉन्फरन्स होत असते. या कॉन्फरन्समध्ये गुन्हेगारांवर वचक रहावा यासाठी सराईत आरोपींचा समावेश या हिस्ट्रीशिटरमध्ये केलेला असतो. हे हिस्ट्रीशीट करण्याचे अधिकार पोलिस अधीक्षक यांनाच असतात. हिस्ट्रीशीट तयार झाले की, त्या आरोपींवर पोलिसांकडून विशेष देखरेख ठेवली जात असते.

पोलीस कोणत्या आधारावर हिस्ट्री शीट तयार करतात?

जेव्हा एखादी व्यक्ती गुन्हेगार असते आणि एकापेक्षा जास्त प्रकरणांमध्ये दोषी सिद्ध झालेली असते. याशिवाय तो वारंवार गुन्हेगारी कारवायांमध्ये गुंतल्याचे आढळून येते. अशा परिस्थितीत एसएचओकडून एसएसपी किंवा एसपी यांना अहवाल पाठवला जातो. त्यानंतर आदेश आल्यावर गुन्हेगाराचे हिस्ट्रीशीट उघडले जाते. हिस्ट्री शीटमध्ये गुन्हेगाराची संपूर्ण कुंडली असते. त्यात त्याचे मित्र आणि ओळखीचे नातेवाईक यांचाही तपशील असतो.

वर्षभरात ४१ सराईत टोळ्या व ७५ प्रोफेशनल आरोपींची भर

अहमदनगर जिल्ह्यात मागील वर्षभरात जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्याच्या हद्दीत गुन्हेगारी कृत्ये करणाऱ्या ३१ जणांचे हिस्ट्रीशीट तयार करण्यात आले असून जिल्ह्यात ४१ सराईत टोळ्या व ७५ प्रोफेशनल आरोपींची गुन्हेगारी जगतात भर पडली असल्याची माहिती मिळाली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News